Home /News /entertainment /

CID नंतर ACP प्रद्युम्न कामाच्या शोधात, शिवाजी साटम यांचा मोठा खुलासा

CID नंतर ACP प्रद्युम्न कामाच्या शोधात, शिवाजी साटम यांचा मोठा खुलासा

CID मध्ये ACP ची भूमिका मराठमोळे अभिनेते शिवाजी साटम (Shivaji Satam) यांनी साकारली होती. शिवाजी साटम यांनी अनेक हिंदी-मराठी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. परंतु त्यांना खरी ओळख CID या मालिकेने मिळवून दिली आहे.

  मुंबई, 19 जानेवारी-   CID ही छोट्या पडद्यावरील तुफान गाजलेली मालिका आहे. टीव्हीवरील सर्वात जास्त काळ चालणारी मालिका म्हणून CID ला ओळखलं जातं. 'दया तोड दो दरवाजा', कुछ तो गडबड है दया' अशा डायलॉग्सने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत अनेक लोक हे डायलॉग रटताना दिसून येतात. लोकांना CID चे कलाकार आपलेसे वाटतात. त्यामुळे वर्षानुवर्षे ही मालिका चालली. दोन-चार वर्षांमागे ही मालिका बंद झाली आहे. परंतु प्रेक्षकांना आजही त्यातील प्रत्येक पात्र तोंडपाठ आहे. मग ते प्रद्युम्न असो, दया असो किंवा अभिजित सर्वांनाच चाहते भरभरून प्रेम देत असतात. CID मध्ये ACP ची भूमिका मराठमोळे अभिनेते शिवाजी साटम   (Shivaji Satam)  यांनी साकारली होती. शिवाजी साटम यांनी अनेक हिंदी-मराठी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. परंतु त्यांना खरी ओळख CID या मालिकेने मिळवून दिली आहे. या मालिकेमुळे ते ACP प्रद्युम्नच्या रूपात घराघरात पोहोचले आहेत. त्यांच्या बोलण्याची शैली, भारदस्त आवाज, हावभाव यामुळे त्या भूमिकेला एक खास वलय प्राप्त झाला आहे. आज त्यांना प्रद्युम्न या नावानेच जास्त करून ओळखलं जातं. परंतु ही मालिका बंद झाल्यानंतर चाहते त्यांना मिस करत आहेत. त्यांना पुन्हा पडद्यावर पाहण्यासाठी आतुर झाले आहेत.
  हिंदुस्थान टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी म्हटलं आहे की, 'मला पुन्हा पदड्यावर वापसी करायची आहे. परंतु मला त्याच त्याच भूमिका नकोशा वाटत आहेत. मला फार ऑफर्स येत आहेत, असं मी अजिबात म्हणणार नाही. कारण माझ्याकडे सध्या काहीच ऑफर्स नाहीत. हे खरं आहे. मला हे सांगायला संकोच वाटत नाही. हा एक-दोन ऑफर्स मिळाल्या होत्या. परंतु त्यासाठी मी तयार नव्हतो. मला काहीतरी नवं हवं आहे. त्यांनी म्हटलं मला गेल्या अनेक वर्षांत पोलिसांच्या अनेक ऑफर्स आल्या आहेत. परंतु एक अभिनेता म्हणून मला त्याच त्याच भूमिका नको आहेत. त्यामुळे मी त्या नाकारल्या. मी मराठी रंगमंचावर काम केलं आहे. त्यामुळे ज्या भूमिका मला रुचतात माळ पचतात मी त्यांचीच निवड करत आलो आहे'. (हे वाचा:एकता कपूरचा झाला ब्रेकअप? म्हणाली 'तुम्हाला रुची असेल तर..... ') तसेच त्यांना विचारण्यात आलं होतं, 'पुढे ACP प्रद्युम्नची भूमिका पुन्हा मिळाली तर ती तुम्ही साकाराल का? यावर उत्तर देताना ते म्हणाले, 'ही भूमिका मिळाली तर ती साकारायला मी सर्वात पुढे असेन. ही भूमिका साकारुन मी अजून नाही कंटाळलो. मला ती भूमिका आवडते'. ही मालिका परत सुरु होऊ शकते असे संकेतसुद्धा यावेळी बोलताना त्यांनी दिले आहेत. परंतु सध्या सर्व चर्चेत आहे. अजून काही नक्की नाही असंही ते म्हणाले'.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Entertainment, Tv actor

  पुढील बातम्या