Home /News /entertainment /

'कुछ तो गड़बड़ है...', CIDमधील दया,अभिजीत आणि फ्रेडी यांचीच झाली फसवणूक

'कुछ तो गड़बड़ है...', CIDमधील दया,अभिजीत आणि फ्रेडी यांचीच झाली फसवणूक

2018 मध्ये CID ही प्रसिद्ध मालिका तब्बल 20 वर्षांनंतर बंद झाली. त्यावेळी अनेक प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र आता इतक्या दिवसानंतर या मालिकेतील दया, अभिजीत आणि फ्रेडिक्स पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

    मुंबई, 21 फेब्रुवारी : जवळपास 2 दशकं प्रेक्षकांच्या मनावर सोनी टीव्ही (Sont tv)वरील 'CID' मालिकेने राज्य केलं. विशेषत: लहान मुलांमध्ये ही मालिका प्रचंड प्रसिद्ध होती. या मालिकेतील ACP प्रद्युमन, सीनियर इन्स्पेक्टर दया, सीनियर इन्स्पेक्टर अभिजीत, इन्स्पेक्टर फ़्रेड्रिक्स, फॉरेन्सिक एक्स्पर्ट डॉ. साळुंखे आणि डॉ. तारिका ही पात्र विशेष गाजली. यानंतरही अनेक पात्र या मालिकेत येत-जात राहिली मात्र या मुख्य भूमिका बजावणाऱ्या कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं.  2018 मध्ये ही मालिका बंद झाली. त्यावेळी अनेक प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र आता इतक्या दिवसानंतर या मालिकेतील दया, अभिजीत आणि फ्रेडिक्स पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. या तिघांची फसवणूक झाल्याचं वृत्त समोर येत आहे. त्यांच्या नव्या मालिकेच्या निर्मात्याकडून ही फसवणूक झाल्याचं समजतंय. त्यामुळे तिघांनी सुद्धा आपल्या नव्या निर्मात्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. (हेही वाचा-कियारा अडवाणीच्या TOPLESS फोटोमागचं गुपित, आणखी एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल) जेव्हा CID 2018 मध्ये ऑफ एअर झालं त्यावेळी अनेक प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती. ही मालिका इतकी प्रसिद्ध होती याच मालिकेच्या धर्तीवर 2019 मध्ये नवी मालिका सुरू करण्यात आली. सीआयएफ (CIF)असं या मालिकेचं नाव होतं. ज्यामध्ये दयानंद शेट्टी (दया), आदित्य श्रीवास्तव (अभिजीत) आणि दिनेश फडणीस (फ्रेडी) हे तिघेही नव्या भूमिकेत दिसले होते.  हा शो दंगल (Dangal) चॅनलवर प्रसारित व्हायचा. CIDच्या धर्तीवर या मालिकेची निर्मिती करण्यात आल्यामुळे ही मालिकासुद्धा काही काळासाठी प्रसिद्धी झोतात होती. (हेही वाचा-VIDEO : 'मला मरायचं आहे...', मानसिक छळाला कंटाळून 9 वर्षाच्या मुलाची आईकडे मागणी) Spotboye च्या अहवालानुसार या मालिकेतील सर्व कलाकारांनी 6-7 महिन्यांसाठी पेमेंटशिवाय काम केलं आणि शेवटी CINTAA (Cine And TV Artistes' Association) कडे त्यांनी तक्रार दाखल केली आहे.  साधारण 10 दिवसांपूर्वी या कलाकारांनी ही तक्रार दाखल केली आहे. 20 वर्ष चालू असणारी CID ही मालिका 1998मध्ये सुरू झाली होती आणि या मालिकेने 1547 एपिसोड पूर्ण केले होते. एक यशस्वी मालिका म्हणून या मालिकेकडे पाहिलं जातं. या मालिकेतील कलाकारांनीच फसवणुकीचा दावा केल्यामुळे टीव्हीसृष्टीमध्ये खळबळ उडाली आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    पुढील बातम्या