Home /News /entertainment /

5 लाख घ्या पण अंत्यसंस्कारात रडा; उद्योजकानं चंकी पांडेंना दिली होती अजब ऑफर

5 लाख घ्या पण अंत्यसंस्कारात रडा; उद्योजकानं चंकी पांडेंना दिली होती अजब ऑफर

अंत्यसंस्कारामध्ये रडण्यासाठी मिळाली होती 5 लाखांची ऑफर; चंकी पांडेंनी सांगितला अजब किस्सा

    मुंबई 7 मे: चंकी पांडे (Chunky Pandey) हे बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेते म्हणून ओळखले जातात. चित्रपटांसोबतच ते आपल्या वैयक्तीक आयुष्यामुळं देखील चर्चेत असतात. अनेक मुलाखतींमध्ये ते आपल्या आयुष्यातील गंमतीदार किस्से सांगून चाहत्यांना आश्चर्यचकित करतात. यावेळी देखील त्यांनी असाच एक अवाक् करणारा किस्सा सांगितला आहे. एका उद्योगपतीच्या अंत्यसंस्कार चक्क रडण्यासाठी त्यांना तब्बल पाच लाख रुपयांची ऑफर मिळाली होती. पाहूया ही ऑफर मिळताच काय म्हणाले होते चंकी पांडे अलिकडेच मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत चंकी पांडे यांनी आपल्या करिअरवर भाष्य केलं. त्यावेळी त्यांनी हा थक्क करणारा किस्सा सांगितला. 2009 साली एका अज्ञात व्यक्तीचा त्यांना फोन आला. या व्यक्तीनं त्यांना एका उद्योगपतीच्या अंत्यसंस्कारासाठी अपस्थित राहण्याची विनंती केली होती. शिवाय त्या उद्योगपतीसाठी माध्यमांसमोर अश्रू गाळण्यासाठी त्यांना पाच लाख रुपये मिळणार होते. अर्थात ही ऑफर ऐकून चंकी पांडे चमकले. रक्कम मोठी अन् ते देखील फक्त चार अश्रू गाळण्यासाठी. त्यांना काय करावं ते सुचत नव्हतं. मग खोलात जाऊन विचार केल्यावर खरी गोष्ट त्यांच्या लक्षात आली. त्या उद्योगपतीचे संबंध बॉलिवूड सेलिब्रिटींशी होते हे भासवायचं होतं त्यामुळं त्यांनी ही ऑफर दिली होती. ‘परत भोपळे चौक अवस्था’; ...अन् प्राजक्ता माळीवर आली भांडी घासायची वेळ अखेर बराच वेळ विचार केल्यानंतर चंकी पांडे यांनी या अंत्यसंस्कारास जाण्यास विरोध दर्शवला. ते म्हणाले त्या व्यक्तीची शेवटची इच्छा मला भेटायची असती तर कदाचित मी गेलो असतो. पम पैसे घेऊन खोटं रडणं तेही खऱ्याखुऱ्या अंत्यसंस्कारात हे काही माझ्या तत्वात बसत नव्हतं. त्यामुळं मी थेट नकार दिला. पण त्यांच्या इच्छे खातर मी एका स्ट्रगलिंग अभिनेत्याला तिथं पाठवलं. त्या निमित्तानं त्याला चार पैसे मिळाले. व मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना बॉलिवूड कनेक्शन दाखवल्याचं समाधान देखील मिळालं.
    Published by:Mandar Gurav
    First published:

    Tags: Bollywood actor, Shocking news

    पुढील बातम्या