मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

चुकीच्या फ्लाईटनं बदलला आयुष्याचा रस्ता; पाहा चंकी पांडेंची भन्नाट लव्ह स्टोरी

चुकीच्या फ्लाईटनं बदलला आयुष्याचा रस्ता; पाहा चंकी पांडेंची भन्नाट लव्ह स्टोरी

त्या एक प्रोफेशनल मॉडेल होत्या. जवळपास 25 वर्षांपूर्वी मिस इंड‍िया या सौंदर्य स्पर्धेच्या निमित्तानं दोघांची पहिली भेट झाली होती.

त्या एक प्रोफेशनल मॉडेल होत्या. जवळपास 25 वर्षांपूर्वी मिस इंड‍िया या सौंदर्य स्पर्धेच्या निमित्तानं दोघांची पहिली भेट झाली होती.

त्या एक प्रोफेशनल मॉडेल होत्या. जवळपास 25 वर्षांपूर्वी मिस इंड‍िया या सौंदर्य स्पर्धेच्या निमित्तानं दोघांची पहिली भेट झाली होती.

    मुंबई 2 मे: चंकी पांडे (Chunky Pandey) हे बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेते म्हणून ओळखले जातात. चित्रपटांसोबतच ते आपल्या वैयक्तीक आयुष्यामुळं देखील चर्चेत असतात. अनेक मुलाखतींमध्ये ते आपल्या आयुष्यातील गंमतीदार किस्से सांगून चाहत्यांना आश्चर्यचकित करतात. यावेळी देखील त्यांनी असाच एक अवाक् करणारा किस्सा सांगितला आहे. हा किस्सा आहे त्यांच्या लव्ह स्टोरीचा. त्या एका चुकीमुळं त्यांची भेट भावनाशी झाली. अन् आजही ते या चुकीसाठी देवाचे आभार मानतात. (Chunky Pandey love story with Bhavna Pandey) भावना पांडे या चंकी पांडे यांच्या पत्नी आहे. त्या एक प्रोफेशनल मॉडेल होत्या. जवळपास 25 वर्षांपूर्वी मिस इंड‍िया या सौंदर्य स्पर्धेच्या निमित्तानं दोघांची पहिली भेट झाली होती. या स्पर्धेतील एका फेरीत चंकी पांडे परिक्षक होते. आपलं काम संपवून ते हैद्राबादला चित्रपटाच्या शूटिंगसाठी जात होते. परंतु रस्त्यावरील ट्राफिकमुळं त्यांची फ्लाईट चुकली. शिवाय दुसरी फ्लाईट यायला थोडा वेळ होता त्यामुळं ते वेळ घालवण्यासाठी एका पबमध्ये गेले त्या ठिकाणी भावना यांच्यासोबत त्यांची दुसरी भेट झाली. टीव्ही अभिनेत्यानं केली कोट्यवधींची फसवणूक; मुंबई पोलिसांनी केली अटक त्यावेळी पबमधील मिणमिणत्या प्रकाशात भावनाचं सैंदर्य पाहून ते त्यांच्या प्रेमातच पडले. मग त्यांनी इकडच्या तिकडच्या गप्पा करता करता त्यांचा फोन नंबर मिळवला. पुढे काही वेळानं भावना तेथून निघाल्या. कारण त्यांना दिल्लीची फ्लाईट पकडायची होती. त्या गेल्यानंतर चंकी पांडे देखील पबमधून निघाले. खरं त्या वेळी ते नंबर मिळाल्याच्या आनंदात होते. अन् या आनंदाची गुंगी इतकी चढली होती की त्यांनी हैद्राबाद ऐवजी दिल्लीची फ्लाईट पकडली. मग काय फ्लाईटमध्ये भावना यांना पाहिलानंतर झालेली चूक त्यांच्या लक्षात आली. पुढे फ्लाईटमधून उतरे पर्यंत भावना देखील चंकी पांडे यांच्या प्रेमात पडल्या होत्या. पुढं दोघांनी लग्न केलं अन् जवळपास 25 वर्ष ते सुखी संसार करत आहे. चंकी पांडे यांनी हा किस्सा अलिकडेच आज तकला दिलेल्या मुलाखतीत सांगितला होता.
    Published by:Mandar Gurav
    First published:

    Tags: Bollywood actor, Entertainment

    पुढील बातम्या