हॉलिवूडचा हा अभिनेता झाला भारताचा फॅन मुलीचं नाव ठेवलं 'इंडिया'

हॉलिवूडचा हा अभिनेता झाला भारताचा फॅन मुलीचं नाव ठेवलं 'इंडिया'

या आधी द. आफ्रिकेचा क्रिकेटपटू जॉन्टी रोड्सनं सुद्धा अशाच प्रकारे त्याच्या मुलीचं नाव इंडिया असं ठेवलं आहे.

  • Share this:

मुंबई, 09 जून : मार्वलच्या सिनेमातील थोर या सुपरहिरोची भूमिका साकारणारा प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता ख्रिस हेम्सवर्थ याचा आगामी सिनेमा 'मॅन इन ब्लॅक : इंटरनॅशनल' 14 जूनला रिलीज होत आहे. पण या सिनेमा व्यतिरिक्त ख्रिस सर्वाधिक चर्चेत आहे ते त्याच्या मुलीच्या नावामुळे. ख्रिसनं त्याच्या मुलीचं नाव इंडिया असं ठेवलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ख्रिसनं आपल्या मुलीचं नावं इंडिया ठेवण्यामागचं कारण सांगितलं.

आयएएनएस दिलेल्या मुलाखती दरम्यान ख्रिस होम्सवर्थला त्याच्या मुलीचं नावं इंडिया ठेवण्यामागचं कारण विचारण्यात आलं. यावर उत्तर देताना ख्रिस म्हणाला, मुलीचं नाव इंडिया ठेवण्याचं कारण माझी पत्नी एल्सा आहे. तिनं बराच काळ भारतात घालवला आहे. त्यामुळे मी माझ्या मुलीचं नाव इंडिया ठेवलं. तसंच या देशाबद्दल माझ्या मनात एक खास स्थान आहे. या देशानं मला खूप प्रेम दिलं आहे. भारतात शूटिंग करण्याचा अनुभव थोडासा भीतीदायक पण खूप मजेशीर होता. इथं शूट करताना मला एखादा रॉकस्टार असल्यासारखं वाटलं.

प्रेग्नंसीनंतर सानिया मिर्झानं 5 महिन्यात असं कमी केलं 22 किलो वजन, पाहा व्हिडिओ

 

View this post on Instagram

 

Hanging in @australia with a real life superhero @elsapatakyconfidential photo by @cristianprieto.filmmaker

A post shared by Chris Hemsworth (@chrishemsworth) on

ख्रिस हेम्सवर्थ 2018मध्ये नेटफ्विक्सचा प्रोजेक्ट 'ढाका'साठी भारतात आला होता. त्यावेळी त्यांनं अहमदाबाद आणि मुंबईमध्ये शूटिंग केलं होतं. ख्रिस सांगतो, दिग्दर्शकाच्या प्रत्येक कट नंतर स्टेडियममध्ये चाहते जल्लोष करत असत. ज्यामुळे आम्हाला आम्ही रॉकस्टार असल्यासारखं वाटायचं. हा अनुभव खरंच अविस्मरणीय होता. तसं पाहायला गेलं तर परदेशी सुपरस्टारनं भारताचा फॅन होण्याची ही पहिलीच वेळ नाही. या आधी द. आफ्रिकेचा क्रिकेटपटू जॉन्टी रोड्सनं सुद्धा अशाच प्रकारे त्याच्या मुलीचं नाव इंडिया असं ठेवलं आहे.

6 मुलांची आई असलेल्या एंजेलिनाला ब्रॅड पिटनं दिली धमकी, घटस्फोट दे नाहीतर...

या मुलाखतीत ख्रिसला बॉलिवूडमध्ये काम करण्याविषयी विचारण्यात आलं. त्यावर ख्रिस म्हणाला, सध्या माझं याबाबत बोलणं सुरू आहे, त्यामुळे कदाचित मी लवकरच बॉलिवूडमध्ये दिसू शकतो. ख्रिस त्याचा आगामी सिनेमा 'मॅन इन ब्लॅक' सीरिजमधील 'मॅन इन ब्लॅक : इंटरनॅशनल'साठी खूप उत्साही आहे. हा सिनेमा इंग्रजी, हिंदी, तमिळ आणि तेलुगू या चार भाषांमध्ये रिलीज होणार आहे.

Bigg Boss Marathi 2- अन् मांजरेकरांनी वीणा- शिवानीवर थंड पाण्याचा वर्षाव केला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 9, 2019 08:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading