S M L

देवीचा उत्सव की संकटांचं तांडव? छोटी मालकीणचा जीव धोक्यात

अण्णासाहेबांचा एकमेव वारसदार असूनही विराटला पूजेचा मान मिळाला नाही ही गोष्ट त्याच्या मनात खदखदतेय. त्यामुळे सुडाच्या आगीने पेटलेल्या विराटने देवीच्या पूजेत विघ्न आणण्याचा प्लॅन आखलाय.

Updated On: Oct 12, 2018 05:48 PM IST

देवीचा उत्सव की संकटांचं तांडव? छोटी मालकीणचा जीव धोक्यात

मुंबई, 12 आॅक्टोबर : स्टार प्रवाहवरील छोटी मालकीण या मालिकेत आलंय धक्कादायक वळण. धामणगावात दरवर्षीप्रमाणे देवीचा उत्सव साजरा केला जातोय. अण्णासाहेब गायब झाल्यानंतर वारसदार म्हणून देवीच्या पूजेचा मान आपल्याला मिळावा यावरून विराट आणि गावकऱ्यांमध्ये रणधुमाळी सुरू आहे. बऱ्याच वादावादीनंतर एकमताने गावकरी विराटऐवजी श्रीधरला देवीच्या पूजेचा मान देतात. यानिमित्ताने नव्या बदलांची नांदी धामणगावात सुरू झालीय.

अण्णासाहेबांचा एकमेव वारसदार असूनही विराटला पूजेचा मान मिळाला नाही ही गोष्ट त्याच्या मनात खदखदतेय. त्यामुळे सुडाच्या आगीने पेटलेल्या विराटने देवीच्या पूजेत विघ्न आणण्याचा प्लॅन आखलाय. विराटचा हा प्लॅन यशस्वी होणार का? देवीच्या उत्सवाला संकाटाचं गालबोट लागणार का? या जीवघेण्या प्रसंगातून रेवा-श्रीधर कसे वाचणार? या साऱ्या प्रश्नांची उत्तरं ‘छोटी मालकीण’च्या महाएपिसोडमधून मिळणार आहेत.

काही दिवसांपूर्वी 'छोटी मालकीण' या मालिकेच्या सेटवर नुकताच पिठलं भाकरीचा बेत रंगला. या मालिकेत श्रीधरची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अक्षर कोठारीला पिठलं खूप आवडतं. त्याने त्याची आवड सेटवर सांगताच दुसऱ्याच दिवशी पिठलं भाकरीचा खास बेत आखण्यात आला. मालिकेत अक्षरच्या आईची भूमिका साकारणाऱ्या वंदना वाकनीस यांनी अक्षरसाठी खास पिठलं बनवून आणलं.तर मालिकेचा प्रोडक्शन मॅनेजर विशाल मोरेनेही अक्षरसाठी पिठलं आणून त्याला खास सरप्राइज दिलं. या अनोख्या मेजवानीने अक्षर खूपच भावुक झाला होता.'सेटवरच्या याच छोट्या मोठ्या गोष्टी नवा हुरूप देत असतात. म्हणूनच तर पडद्यामागे दिसणारी केमिस्ट्री सीनमधूनही खुलून येते.' असं मत अक्षर कोठारीने व्यक्त केलं.

VIDEO : कुठली मालिका आहे नंबर वन? #TRPमीटर काय सांगतोय बघा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 12, 2018 05:48 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close