• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • सुप्रसिद्ध कोरिओग्राफर दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर? भाचीसोबत रिलेशनच्या चर्चांना उधाण

सुप्रसिद्ध कोरिओग्राफर दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर? भाचीसोबत रिलेशनच्या चर्चांना उधाण

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीच नाही तर बॉलिवूडही गाजवणारा कोरिओग्राफर दुसऱ्यांदा लग्न करणार असल्याच्या चर्चा सध्या रंगायला लागल्या आहेत.

 • Share this:
  मुंबई, 12 नोव्हेंबर: ग्रूप डान्सरपासून आपल्या करिअरला सुरुवात करणाऱ्या प्रभु देवाचं (Prabhudeva)नाव आज बॉलिवूडचा टॉप कोरिओग्राफर म्हणून घेतलं जात. प्रभु देवा स्वत: उत्तम दिग्दर्शक आणि अभिनेताही आहे. प्रभु देवा सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. काही वर्षांपूर्वी त्याने आपल्या बायकोशी घटस्फोट घेतला होता. प्रभु देवाची आधीची पत्नी रामलतासोबत टोकाचे वाद झाल्यानंतर त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता. नवभारत टाइम्सच्या वृत्तानुसार, प्रभु देवा आता पुन्हा एकदा लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. प्रभु देवा त्याच्या भाचीसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. अद्याप त्याच्या टीमकडून कोणतीही पक्की खबर मिळालेली नाही. प्रभु देवाने नुकतंच सलमान खान (Salman Khan)च्या राधे: यूअर मोस्ट वॉन्टेड भाई (Radhe: Your Most Wanted Bhai)या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. लवकरच तो एका तामिळ सिनेमामध्ये मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे. अभिनेता म्हणून प्रभु देवाचा हा 50वा सिनेमा आहे. या फिल्मचं नाव 'पोन मनिकवेल' असं आहे. या सिनेमामध्ये प्रभु देवा पहिल्यांदाच पोलिसाची भूमिका साकारणार आहे. प्रभु देवाने शुन्यातून आपलं विश्व उभं केलं आहे. त्याने आपल्या करिअरची सुरुवात ग्रूप डान्सर म्हणून केली होती. पण नृत्य या कलेवर मनापासून प्रेम करणाऱ्या प्रभु देवाने जिद्द सोडली नाही. आता त्याचं नाव दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीच काय बॉलिवूडमध्येही गाजत आहे. जगभारत त्याचे चाहते आहेत. प्रभु देवाचं करिअर फक्त नृत्य दिग्दर्शक म्हणून सीमित राहिलं नाही. त्याने अभिनय आणि दिग्दर्शनाच्या वाटाही चोखाळल्या. त्यामध्येदेखील सफलता मिळवली. आता तो खरंच दुसरं लग्न करणार का? हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईलच.
  Published by:Amruta Abhyankar
  First published: