मुंबई, 29 नोव्हेंबर: कोरिओग्राफर शिव शंकर मास्तर यांचे निधन (Shiva Shankar passes away) झाले आहे. वयाच्या 72 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतली असुन त्यांना गेल्या काही काळापासून कोरोना (COVID 19) ची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना हैदराबादच्या आयजी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पण अखेर त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.
कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर शिवशंकर आणि त्यांचा मोठा मुलगा दोघेही काही दिवसांपूर्वी कोरोनाचे बळी ठरले होते. शिवशंकर यांची प्रकृती ढासळू लागली, त्यानंतर त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आले मात्र, अखेर त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. त्यांच्या जाण्याने साउथ इंडस्ट्रीसह बॉलिवूडलाही मोठी धक्क बसला.
शिवशंकर यांच्या निधनाची माहिती समोर आल्यानंतर चित्रपट निर्माते एसएस राजामौली आणि सोनू सूद यांच्यासह अनेक कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे. त्याच्या कुटुंबाला आर्थिक अडचणींमुळे चांगले उपचार मिळू शकले नसल्याची बातमी आल्यावर सोनू सूदने नुकतीच मदतीचा हात पुढे केला होता. शिवशंकर मास्तर यांच्या निधनानंतर सोनू सूदने ट्विट करून शोक व्यक्त केला.
तसेच ट्विट करत सोनू सूदने आपली भावना ट्विट करत व्यक्त केली. तो म्हणाला, ' शिवशंकर मास्तर यांच्या निधनाची बातमी ऐकून खूप दुःख झाले. आम्ही त्यांना वाचवण्याचा खूप प्रयत्न केला पण देवाने काही वेगळेच ठरवले होते. मास्तरजींना आपण सदैव लक्षात ठेवू. हे दु:ख सहन करण्याची ईश्वर कुटूंबियांना शक्ती देवो. चित्रपट सदैव तुमची आठवण ठेवेल सर.'' अशा आशयाचे ट्विट त्याने केले आहे.
चित्रपट निर्माते एसएस राजामौली यांनी शिवशंकर यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. 'शिवशंकर मास्तर गुरू यांचे निधन झाले हे जाणून दुःख झाले. मगधीरा या चित्रपटात त्याच्यासोबत काम करणे हा एक संस्मरणीय अनुभव आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो. त्यांच्या कुटुंबाप्रती माझ्या संवेदना. असे राजामौली यांनी म्हटले आहे.
शिवशंकर हे साऊथ सिनेसृष्टीतील प्रसिद्ध कोरिओग्राफर आहेत. शिवशंकर अनेक वर्षांपासून दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये सक्रिय आहेत. 'मगधीरा'मधील 'धीरा-धीरा' हे गाणेही त्यांनी कोरिओग्राफ केले आहे. नृत्यदिग्दर्शनासाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला आहे. या चित्रपटात राम चरण आणि काजल अग्रवाल मुख्य भूमिकेत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.