जेव्हा प्रेक्षकच नाटक थांबवतो, चिन्मय मांडलेकरनं सांगितला किस्सा

जेव्हा प्रेक्षकच नाटक थांबवतो, चिन्मय मांडलेकरनं सांगितला किस्सा

एका प्रेक्षकानं थोडे क्षण नाटकच बंद केलं. चिन्मय मांडलेकरनं हा किस्सा सांगितला.

  • Share this:

मुंबई, 30 मे : आपण नेहमी नाटकाला जातो तेव्हा सुरुवातीलाच एक घोषणा केली जाते. ती म्हणजे कृपया आपले मोबाइल बंद करून ठेवा. बऱ्याचदा ती पाळली जात नाही. पण नाटक चालू असताना फोन वाजला, तर प्रेक्षक कसनुसा होऊन ताबडतोब फोन बंद करतो. पण एका प्रेक्षकानं थोडे क्षण नाटकच बंद केलं. चिन्मय मांडलेकरनं हा किस्सा सांगितला.

कानाला खडा या शोमध्ये चिन्मयनं हा किस्सा शेअर केला. सुखांशी भांडतो आम्ही हे नाटक सुरू होतं. रंगमंचावर डाॅ. गिरीश ओक आणि चिन्मय यांच्यात संवाद सुरू होते. इतक्यात पहिल्याच रांगेत बसलेल्या प्रेक्षकाचा फोन वाजला. त्याबरोबर तो मोठमोठ्यानं बोलायला लागला. त्या शांततेत त्या प्रेक्षकाचाच आवाज घुमायला लागला.

TRP मीटर : शेलिब्रिटी पॅटर्नची 'हवा' वाढली तर शनायाचं स्थान धोक्यात

तसा चिन्मय हाताची घडी घालून त्याच्याकडे पाहत उभा राहिला. तेव्हा प्रेक्षकानं दोन मिनिटं थांबा, अशी खूण केली. नंतर त्याचं बोलणं संपल्यानंतर आता चालू दे म्हणून खूणही केली. अशा महाभागाला चिन्मयनं कोपरापासून दंडवत घातलं.

'खुद को बचाओ' कतरिना कैफचा सलमानच्या 'या' अभिनेत्रीला सल्ला

येत्या शुक्रवारी कानाला खडा कार्यक्रमात चिन्मय मांडलेकर हा गेस्ट आहे. संजय मोनेशी गप्पा मारताना त्यानं अशा बऱ्याच गोष्टी उलगडल्यात.

...म्हणून 'छपाक'च्या सेटवर सर्वांसमोर दीपिकाला कोसळलं होतं रडू

मध्यंतरी चिन्मयनं क्राइम पेट्रोल दस्तक मालिकेत काम केलं होतं. त्यावेळी तो म्हणाला होता, ' यात प्रत्येक इन्स्पेक्टर त्याची गोष्ट सांगतो. म्हणजे फक्त एखादी केसच नाही, तर पोलिसांच्या शारीरिक, कौटुंबिक समस्या यात असतात. बरं, प्रत्येक पोलीस इन्स्पेक्टर त्याच्या त्याच्या वृत्तीनुसार त्या केसकडे पाहतो. हेही अधोरेखित झालंय.'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 30, 2019 08:43 PM IST

ताज्या बातम्या