• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • 'कलाकाराला तुमच्या राज्यात...', अपघातानंतर अभिनेत्री वर्षा दांदळेंची मुख्यमंत्री ठाकरेंसाठी खास पोस्ट

'कलाकाराला तुमच्या राज्यात...', अपघातानंतर अभिनेत्री वर्षा दांदळेंची मुख्यमंत्री ठाकरेंसाठी खास पोस्ट

काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री वर्षा दांदळे (Marathi actress varsha dandale) यांचा यांचा भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली (Varsha dandale accident). होती. आता वर्षा दांदळे यांच्या अपघाताची बातमी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांपर्यत (Chief Minister Uddhav Thackeray) जाऊन पोहोचली आहे.

 • Share this:
  मुंबई, 20 ऑक्टोबर:  काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री वर्षा दांदळे (Marathi actress varsha dandale) यांचा यांचा भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली (Varsha dandale accident). होती. गंभीर अपघातामुळे त्यांच्या मणक्याला जबरदस्त दुखापत झाली, या खेरीज त्यांच्या उजव्या पायाला देखील भयंकर मार लागमला होता. तसेच त्यांच्या चेहऱ्यावर देखील मार लागल्याच्या खुणा होत्या. त्यामुळे त्यांची प्रकृती अधिकच खालावलेली दिसत होती. पाठीला आणि पायाला दुखापत झाल्याने त्यांना कुठलीच हालचाल करणे शक्य होत नव्हते, त्या अवस्थेत त्यांनी प्रेक्षकांना माझ्यासाठी प्रार्थना करा अशी विनंती केली होती. त्यांची अशी अवस्था पाहून सर्वांनी त्यांना लवकर बरे होण्याच्या शुभेच्छा दिल्या होत्या. आता वर्षा दांदळे यांच्या अपघाताची बातमी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांपर्यत (Chief Minister Uddhav Thackeray) जाऊन पोहोचली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या प्रकृतीची दखल घेतली आहे. याबाबत वर्षा दांदळे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून खुलासा केला आहे. त्यांनी इन्स्टा पोस्ट करत म्हटले आहे की, “बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षिका व अभिनेत्री श्रीमती वर्षा दांदळे यांच्या अपघाताची बातमी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना समजताच त्यांनी श्रीमती वर्षा दांदळे यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना नाशिक येथे जाऊन त्यांची भेट घेण्याचे निर्देश दिले.
  त्यानुसार मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी शिक्षिका व अभिनेत्री वर्षा दांदळे यांची नाशिक येथील त्यांच्या राहत्या घरी जाऊन भेट घेतली तसेच तब्येतीची आस्थेने विचारपूस केली. तसेच पुन्हा आपण चित्रपट क्षेत्रात नव्या उत्साहाने, उमेदीने काम करून प्रेक्षकांचे मनोरंजन करावे, अशा शुभेच्छा दिल्या. यासोबतच आजारातून लवकर बरे होण्यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना केली. याप्रसंगी नगरसेविका सिंधू मसुरकर उपस्थित होत्या.“धन्यवाद मुख्यमंत्री साहेब, धन्यवाद महापौर मॅडम, कलाकाराला तुमच्या राज्यात मान आहे प्रेम आहे शतशः प्रणाम”.. असे म्हणून वर्षा ताईंनी या सर्वांचे आभार मानले आहेत. वाचा : Aai Kuthe Kay Karte :अरुंधतिच्या आयुष्यात होणार ‘या’ खास व्यक्तीची एंट्री वर्षा दांदळे या मूळच्या अकोल्याच्या. लग्नानंतर त्या मुंबईत स्थायिक झाल्या. अभिनयाचा त्यांचा प्रवास खूपच उल्लेखनीय असाच आहे. संगीत शिक्षिकेची नोकरी करत असताना त्यांनी नाटकात काम करण्यास सुरुवात केली. झी मराठी वाहिनीवरील नांदा सौख्य भरे या मालिकेतून त्या प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. या मालिकेत त्यांनी साकारलेली वच्छी अत्याची भूमिका खूपच गाजली होती. याच नावाने त्यांना ओळख देखील मिळाली. वाचा : Bigg Boss च्या घरात सोनालीच चाललंय तरी काय ? आदिशसोबत चपातीवरून जोराचा वाद पुढे नकटीच्या लग्नाला यायचं हं या मालिकेत त्यांनी लता काकूची भूमिका साकारली मग घाडगे आणि सूनमधील सुकन्या कुलकर्णीची मोठी जाऊ झाल्या. स्वामी समर्थांच्या कृपा-सिंधू या मालिकेतील सुंदरा बाई या भूमिकेने त्यांना वेगळी ओळख मिळवून दिली. शिवाय पाहिले न मी तुला मालिकेत उषा मावशी म्हणून गोड. प्रेमळ सासूचीही त्यांची भूमिका सर्वांना आवडली. याशिवाय वर्षा यांनी एकाच या जन्मी जणू, आनंदी हे जग सारे यांसारख्या अनेक मालिकांमध्ये तसेच नाटकांमध्ये ही काम केलं आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published: