मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Hardeek-Akshaya: हार्दीक अक्षयाच्या लग्नाचं रिसेप्शन सुरू होत पण मध्येच फोन वाजला अन्...; त्या कॉलची होतेय चर्चा

Hardeek-Akshaya: हार्दीक अक्षयाच्या लग्नाचं रिसेप्शन सुरू होत पण मध्येच फोन वाजला अन्...; त्या कॉलची होतेय चर्चा

हार्दीक अक्षया

हार्दीक अक्षया

दोघांच्या लग्नाचं रिसेप्शन सुरू होतं आणि तेवढ्यात फोन वाजला आणि सगळ्यांच्या नजरा त्या फोनकडे वळल्या. ऐन लग्नात राणा अंजलीला नेमका कोणाचा फोन आला होता. जाणून घ्या.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Minal Gurav

मुंबई, 06 डिसेंबर : अभिनेता हार्दीक जोशी आणि अक्षया नाईक नुकतेच लग्नबंधनात अडकले.  2 डिसेंबरला दोघांनी पुण्यात लग्न केलं. तुझ्यात जीव रंगला या मालिकेतून या जोडीनं प्रेक्षकांची मनं जिंकली. राणा आणि अंजलीची ही रील लाईफ जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली. दोघांची ऑन स्क्रिन केमिस्ट्री प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली. ऑनस्क्रिन काम करता करता दोघांची ऑफस्क्रिन जोडी देखील मालिकेच्या सेटवरच जमली. पाच वर्ष एकत्र मालिका केल्यानंतर अखेर हे रील लाईफ कपल रिअल लाईफमध्ये एकत्र आलं. अक्षया आणि हार्दीक यांच्या लग्नाची सगळेच आतूरतेनं वाट पाहत होते.  मराठी सिनेसृष्टीत अनेक कलाकार हार्दीक अक्षयाच्या लग्नाला आले होते. मेहंदीपाहून, हळद, संगीत, लग्न रिसेप्शनपर्यंत सगळ्या विधी मोठ्या धुमधडाक्यात पार पडल्या. दोघांच्या लग्नाचं रिसेप्शन सुरू होतं आणि तेवढ्यात फोन वाजला आणि सगळ्यांच्या नजरा त्या फोनकडे वळल्या. ऐन लग्नात राणा अंजलीला नेमका कोणाचा फोन आला होता. जाणून घ्या.

राणा आणि अंजलीच्या लग्नाला त्यांचे जवळचे मित्र मैत्रीणी आणि नातेवाईक शिवाय मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. तसंच अनेक राजकीय पक्षातील लोकांना देखील दोघांनी आमंत्रण दिलं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही दोघांनी लग्नाचं आमंत्रण दिलं होतं.  मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लग्नाला उपस्थित राहता आलं नाही. त्यामुळे त्यांनी व्हिडीओ कॉल करून दोघांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्राच्या लाडक्या जोडीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडीओ कॉलवर दिलेल्या शुभेच्छांचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

हेही वाचा - Akshaya-Hardeek Love Story : आधी 'या' अभिनेत्याच्या प्रेमात होती अक्षया; मग असा रंगला हार्दीकवर जीव

View this post on Instagram

A post shared by fillamwala (@fillamwala)

व्हिडीओ कॉलवर मुख्यमंत्र्यांनी हार्दीक आणि अक्षयाला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री प्रवासात असतानाही त्यांनी वेळ काढून दोघांना शुभेच्छा दिल्या. 'मला लग्नाला यायला मिळालं नाही म्हणून व्हिडीओ कॉलवर शुभेच्छा देतोय', असं मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छांनंतर दोघांनी त्यांचे आभार मानले. तसंच' ठाण्यात आलो की भेटायला येतो', असंही म्हटलं.

हार्दीक आणि अक्षया यांच्या लग्नातील मराठमोळ्या लुकनं सर्वांचं लक्ष वेधलं होतं. दोघांनी मराठमोळ्या पारंपरिक लुकमध्ये आणि पारंपरिक पद्धतीनं लग्न केलं.  दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दोघांना चाहत्यांकडून प्रेम आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

First published:

Tags: Cm eknath shinde, Eknath Shinde, Marathi actress, Marathi entertainment, Marathi news, Wedding