Home /News /entertainment /

छोटी सरदारनी फेम Anita Raaj यांना पुन्हा कोरोनाची लागण, दोन महिन्यापूर्वीच आल्या होत्या पॉझिटीव्ह

छोटी सरदारनी फेम Anita Raaj यांना पुन्हा कोरोनाची लागण, दोन महिन्यापूर्वीच आल्या होत्या पॉझिटीव्ह

Anita Raaj

Anita Raaj

कलर्सवरील लोकप्रिय मालिका 'छोटी सरदारनी' (Chhoti Sarrdaarni) मध्ये कुलवंत कौरच्या भूमिकेत दिसणाऱ्या अभिनेत्री अनिता राज (Anita Raaj) यांना कोरोनाची लागण झाली आहे.

    नवी दिल्ली, 5 जानेवारी: कलर्सवरील लोकप्रिय मालिका 'छोटी सरदारनी' (Chhoti Sarrdaarni) मध्ये कुलवंत कौरच्या भूमिकेत दिसणाऱ्या अभिनेत्री अनिता राज (Anita Raaj) यांना कोरोनाची लागण झाली आहे. विशेष म्हणजे, त्यांना दोन महिन्यापूर्वी कोरोना झाला होता. आता पुन्हा त्यांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात त्यांना कोरोनाची लागण (Anita Raaj tests positive for COVID 19) झाली होती. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, 'छोटी सरदारनी' फेम अनिता राजला कोरोनाची लागण झाल्याची माहिती टीम युनिटने दिली आहे. त्यांच्या पॉझिटीव्ह रिपोर्टनंतर त्यांनी स्वतःला आयसोलेट केले आहे. तसेच संपूर्ण युनिटने देखील टेस्ट केली पण दिलासादायक गोष्ट म्हणचे सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. अशी माहिती टीमने दिली आहे. अनिता राज यांना कोरोनाची लागण होण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये त्यांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला होता. एवढेच नाही तर 2020 च्या एप्रिल महिन्यात अनिता राज यांच्यावर कोरोना व्हायरसच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोपही करण्यात आला होता. पुणे मिररच्या वृत्तानुसार, अनिता राजवर तिच्या घरी काही मित्रांना पार्टीसाठी आमंत्रित केल्याचा आरोप होता. अनिता यांनी वयाची पन्नाशी पार केली असली तरी त्या खूपच फिट आहेत. त्या न चुकता रोज व्यायाम करतात. व्यायामा करतानाचे फोटो अनिता नेहमीच सोशल मीडियावर पोस्ट करत असतात.
    Published by:Dhanshri Otari
    First published:

    Tags: Corona, Tv actress

    पुढील बातम्या