Chhichhore Trailer: 'पता नहीं क्या जादू है कॉलेज लाइफ मैं... जहां अंजाने मिलते है और दोस्त बन जाते है...'

'दंगल' सिनेमाचे दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.

'दंगल' सिनेमाचे दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.

  • Share this:
    मुंबई, 04 ऑगस्ट- सध्या बॉलिवूडच्या अनेक बिग बजेट सिनेमांची जोरदार चर्चा सुरू आहे. या दरम्यान एक धमाकेदार विनोदीपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सुशांत सिंग राजपूत आणि श्रद्धआ कपूर स्टारर छिछोरे सिनेमाचा ट्रेलर नुकताच शेअर करण्यात आला. सुशांत आणि श्रद्धाशिवाय या सिनेमात अनेक कलाकार दिसतील. ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या काही तासांत तो यूट्यूबवर ट्रेण्डही करत आहे. छिछोरे सिनेमाच्या ट्रेलरला ट्विटरवरही सकारात्मक रिव्ह्यू मिळत आहेत. नितेश तिवारी दिग्दर्शित या सिनेमात सर्व व्यक्तिरेखांची कॉलेजच्या दिवसांपासून ते म्हातारपणापर्यंतची गोष्ट सांगण्यात आली आहे. या सिनेमाचं वैशिष्ट्य म्हणजे याचा ‘देसीपणा’. हा भारतीयपणा सुशांत आणि त्याच्या टीमने चांगल्या पद्धतीने सिनेमात उतरवला आहे. ट्रेलरच्या सुरुवातीला भरपूर शिव्या ऐकायला मिळतात. मात्र यात शिव्यांच्यावेळी गोळ्यांचा आवाज ऐकू येतो. मात्र त्यांच्या बोलण्यावरून ते नक्की कोणती शिवी देतात ते साऱ्यांनाच कळतं. इथे पाहा ट्रेलर- मैत्री- प्रेम आणि तक्रार असे आवश्यक ते सर्व प्रकारचे मसाले सिनेमात दिसतात. विशेष म्हणजे सिनेमात मित्रांची अशी एक टीम दाखवण्यात आली आहे ज्या टीमचं नाव लूझर्स असतं. ही टीम दुसऱ्या टीमला हरवण्यासाठी स्पर्धेत उतरताना दिसते. सिनेमाच्या प्रत्येक सीनमध्ये विनोदाची अचूक प्रेरणी झालेली ट्रेलरमध्ये दिसते. सुशांत सिंग राजपूत आणि श्रद्धा कपूरसोबत या सिनेमात वरुण शर्मा, ताहिर राज भसीन आणि तुषार पांडे यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. येत्या 30 ऑगस्टला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. श्रद्धाच्या आगामी सिनेमाबद्दल बोलायचे झाले तर लवकरच ती सुपरस्टार प्रभाससोबस साहो सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मुसळधार पावसामुळे सुबोध भावेचा 3 तास स्टेशनवर खोळंबा, नागरिकांना केलं 'हे' आवाहन मानसिक आजाराने त्रस्त गोविंदा? जवळच्या मित्राने केला खुलासा पावसाचा फटका मालिकांनाही, रात्रीस खेळ चाले मालिकेचं चित्रीकरण थांबलं VIDEO: मालाडमध्ये घरात गुडघ्याभर पाणी, नागरिकांचे हाल
    Published by:Madhura Nerurkar
    First published: