Chhichhore Review : श्रद्धा-सुशांतनं जागवल्या कॉलेज लाइफच्या आठवणी, वाचा प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

Chhichhore Review : श्रद्धा-सुशांतनं जागवल्या कॉलेज लाइफच्या आठवणी, वाचा प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

सुशांत सिंह राजपूत, श्रद्धा कपूर, वरुण शर्मा, प्रतीक बब्बर यांच्यासारखी तगडी स्टारकास्ट असेलेला ‘छिछोरे’ आज रिलीज झाला.

  • Share this:

मुंबई, 06 सप्टेंबर : सुशांत सिंह राजपूत, श्रद्धा कपूर, वरुण शर्मा, प्रतीक बब्बर यांच्यासारखी तगडी स्टारकास्ट असेलेला ‘छिछोरे’ अखेर आज रिलीज झाला. 2016 मध्ये आलेल्या ‘दंगल’ सारखा सुपरहिट सिनेमा देणारे दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या दिग्दर्शनखाली तयार झालेल्या ‘छिछोरे’ला सध्या सोशल मीडियावर खूप चांगल्या प्रतिक्रिया मिळत आहेत. एकूणच कॉलेज लाइफ आणि मस्ती यावर आधारित असलेल्या या सिनेमानं प्रेक्षकांच्या आठवणी जागवल्या असं म्हणायला हरकत नाही. हा सिनेमा प्रेक्षाकांच्या पसंतीत उतरल्याचं त्यांच्या प्रतिक्रियांवरुन लक्षात येतं. वाचा 'छिछोरे'चा पब्लिक रिव्ह्यू...

आईच्या प्रसिद्धीचा मॅनेजर्स गैरफायदा घेत आहेत, रानू यांच्या मुलीचा गंभीर आरोप

छिछोरे सिनेमातील प्रेक्षकांना सर्वाधिक भावलेली गोष्ट ही आहे की, या सिनेमात दाखवण्यात आलेलं कॉलेज लाइफ. या सिनेमामुळे सर्वांच्याच कॉलेजमधील आठवणी ताज्या झाल्या.

या सिनेमाबाबत एका युजरनं लिहिलं, सुशात आणि श्रद्धाच्या या सिनेमात मैत्री आहे. इमोशन्स आहेत आणि एक चांगला मेसेज सुद्धा. सिनेमा पाहिल्यावर कॉलेजचे दिवस आठवले. तर दुसऱ्या एका युजरनं लिहिलं, हा सिनेमा सर्वाधिक मनोरंजन करणारा सिनेमा आहे. या सिनेमाच्या टीमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे.

Pal Pal Dil Ke Pas Trailer रिलीज, या कारणानं लाँचला पोहोचू शकला नाही सनी देओल

काही युजर्सनी या सिनेमाच्या इंटरव्हलच्या आधीच्या भागाबाबत प्रतिक्रिया दिल्या आहेत, त्यांनी लिहिलं, सिनेमा पाहताना असं वाटतंय की मी आताही कॉलेजचे दिवस जगत आहे. सिनेमातील प्रत्येक कलाकाराचा अभिनय खूप दमदार आहे. छिछोरेच्या प्रत्येक कलाकाराचं कौतुक केलं जात आहे. या सिनेमाचं नाव जरी छिछोरे असलं तरीही सिनेमा मात्र तसा नाही. यात कॉमेडी, रोमान्स आणि इमोशन सर्वकाही पाहायला मिळतं. यात सुशांतचा अभिनय कमाल आहे. अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे.

रात्रीस खेळ चाले : शेवंताच्या बदललेल्या रूपामागचं 'हे' आहे रहस्य

===========================================================

VIDEO: आरेतील वृक्षतोडीवर उर्मिला मातोंडकर यांचा कडाडून विरोध म्हणाल्या...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 6, 2019 11:13 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading