Home /News /entertainment /

Shahu Chhatrapati film : जितेंद्र आव्हाड घेऊन आले लोकराजाची कथा; 'शाहू छत्रपती' सिनेमाचा फर्स्ट लुक पाहा

Shahu Chhatrapati film : जितेंद्र आव्हाड घेऊन आले लोकराजाची कथा; 'शाहू छत्रपती' सिनेमाचा फर्स्ट लुक पाहा

मराठी चित्रपटांमध्ये सध्या ऐतिहासिक विषयावरील (Marathi Historic movies) चित्रपटाला मोठी मागणी आहे. याच चित्रपटांच्या यादीत एका मोठ्या चित्रपटाचं नाव गणलं जाणार आहे.

  मुंबई 25 जून: मराठी चित्रपटसृष्टीत (Marathi Historic biopic) सध्या अनेक महान व्यक्तिमत्त्वांवर आधारित चित्रपट सध्या ट्रेंडमध्ये आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, मोगलमर्दिनी ताराराणी अशा इतिहासतील महान व्यक्तिमत्त्वांवर चित्रपट येण्याच्या मार्गावर आहेत. अनेकांकडून या विषयावरच्या चित्रपटांचं कौतुक सुद्धा केलं जात असतं. याच चित्रपटांमध्ये आणखी एका चित्रपटाची वाढ होणार आहे. डॉ. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे राजकारणात सक्रिय असणारं एक मोठं नाव आहे. जितेंद्र आव्हाड यांची प्रस्तुती असणारा अजून एक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक चित्रपट येत्या काळात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘शाहू छत्रपती’ (Shahu Chhatrapati new marathi movie) हा चित्रपट येत्या काळात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. छत्रपती शाहू महाराज यांचा जीवनपट उलगडणारा हा सिनेमा असून याचा फर्स्ट लुक काहीच वेळापूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. (Rajshri Shahu Maharaj) शाहू महाराजांना लोकांचं कल्याण करणारा एक लोकपुरुष म्हणून पाहिलं जात. त्यांच्या आयुष्याचे कंगोरे या चित्रपटाच्या माध्यमातून उलगडले जाणार आहेत. आव्हाड यांनी स्वतः सोशल मीडियावरून (Jitendra awhad Instagram) याबद्दल माहिती देत या चित्रपटाचा फर्स्ट लुक शेअर केला आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन वरुण सुखराज यांनी केलं असून, डॉ. जयसिंगराव पवार यांची ही कथा आहे असं या व्हिडिओतून स्पष्ट होत आहे. या टिझर मध्ये एक पोवडा ऐकू येत असून छत्रपती शिवाजी महाराजांना आणि महाराणी ताराराणींना नमन करून त्यांच्या लेकराची कथा मांडत आहोत राजा नव्हे तर राजर्षी ची कथा सांगायला आलो आहोत अशा अर्थाचं या आवाहन यात केलं आहे. खणखणीत आवाजात ऐकू येणारा पोवाडा अशा पार्श्वभूमीवर मराठी इतिहासातील या महान राजाची कथा पाहायला मिळणार अशी आशा वर्तवली जात असल्याने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात मोठी कामगिरी करणारे लोकांचे नेते म्हणून ओळख असलेल्या शाहू महाराजांना मोठ्या पडद्यावर पाहायला प्रेक्षक उत्सुक झाले आहेत.
  हा चित्रपट सहा भाषांमध्ये रिलीज होणार असून आता महाराष्ट्राबाहेरील प्रेक्षकांना सुद्धा महाराजांची यशोगाथा पाहायला मिळणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने जितेंद्र आव्हाड हे मराठी चित्रपटसृष्टीत आपलं योगदान देताना दिसणार आहेत. हा चित्रपट 2023 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हे ही वाचा- Marathi well promoted movies: चंद्रमुखी ते धर्मवीर; मराठी चित्रपटांच्या प्रमोशनचा नवा फंडा तिकीटबारीवर करतो दंगा यामध्ये आता शाहू महाराजांचं काम कोण करेल याबद्दल चराहच होताना दिसत आहे. प्रेक्षकांसाठी एक दैवत असणाऱ्या या व्यक्तीला मोठ्या पडद्यावर कोण सादर करणार याची उत्सुकता लागुम राहिली आहे. एकूणच या नव्या मोशन पोस्टर किंवा फर्स्ट लुक टिझरमुळे आता एक वेगळा ऐतिहासिक बायोपिक पाहायला मिळणार यात शंका नाही.
  Published by:Rasika Nanal
  First published:

  Tags: History, Jitendra awhad, Marathi entertainment

  पुढील बातम्या