Chhapaak Trailer : …आणि कार्यक्रमात ढसाढसा रडायला लागली दीपिका पदुकोण, VIDEO VIRAL

Chhapaak Trailer : …आणि कार्यक्रमात ढसाढसा रडायला लागली दीपिका पदुकोण, VIDEO VIRAL

तब्बल एका वर्षानंतर दीपिका पदुकोण 'छपाक' सिनेमातून पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.

  • Share this:

मुंबई, 10 डिसेंबर : ‘पिकू', 'रामलीला', 'बाजीराव मस्तानी', 'पद्मावत' यांसारख्या सिनेमातून बॉलिवूडमध्ये यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचलेली अभिनेत्री दीपिका पदुकोण ही आता वेगळ्या भूमिकेसाठी सज्ज झाली आहे. दीपिका अ‍ॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अग्रवाची कहाणी घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आजच ‘छपाक' या सिनेमाचा ट्रेलर लॉंच झाला. निर्माती म्हणून पदार्पण करणाऱ्या दीपिकासाठी हा एक वेगळा अनुभव होता.

या सिनेमाच्या ट्रेलर लॉंच दरम्यान दीपिकाला लक्ष्मी अग्रवालच्या भुमिकेबाबत विचारले असता, तिला अश्रु अनावर झाले. आपल्या अनुभवाबाबत सांगताना, “मी जेव्हा जेव्हा हा ट्रेलर पाहते तेव्हा तेव्हा मला अश्रु अनावर होतात. आपल्या देशात आपण पीडितांना चांगली वागणूक देत नाही, त्यांना गुन्हेगारासारखं वागवलं जातं”, असे मत दीपिकानं व्यक्त केले. तसेच, ही भुमिका खास असल्याचेही दीपिका यावेळी म्हणाली.

वाचा-अंगावर शहारे आणणारा 'छपाक', मन हेलावणारा दीपिका पदुकोणचा अभिनय

 

View this post on Instagram

 

#deepikapadukone gets emotional after the trailer of her film #chhapaak #viralbhayani @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

वाचा-घरी आल्यानंतर व्हायरल झाला लता दीदींचा 'हा' PHOTO, पाहून वाढेल चिंता

'राझी' सारख्या यशस्वी सिनेमानंतर दिग्दर्शिका मेघना गुलजार 'छपाक'चं दिग्दर्शिन करत आहे. दीपिका पदुकोण लक्ष्मी अग्रवालची व्यक्तिरेखा 'मालती' या नावाने साकारत आहे. दीपिकाबरोबच या चित्रपटात विक्रांत मेस्सी प्रमुख भुमिकेत आहे. हा चित्रपट पुढील वर्षी 10 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.

वाचा-Marathi Trailer - Tanhaji : 'प्रत्येक मराठ्यात दडलाय लाख मराठा', पाहा VIDEO

दीपिकानं जाळले प्रोस्थेटिक्स

या सिनेमात अ‍ॅसिड हल्ला पीडितेची व्यक्तिरेखा साकरण्यासाठी दीपिकानं प्रोस्थेटिक्स मेकअपची मदत घेतली होती. या लुकसाठी दीपिकाला तासंतास मेकअप करावा लागत असे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दीपिकानं छपाकच्या शूटिंग संपल्यावर शेवटच्या दिवशी तिनं हे प्रोस्थेटिक्स लुक जाळून टाकल्याचा खुलासा केला होता. दीपिका म्हणाली, "मी या प्रोस्थेटिक्सचा एक तुकडा घेतला. अल्कोहोल घेतलं आणि एका कोपऱ्यात नेऊन तो प्रोस्थेटिक्स जाळून टाकला".

कोण आहे लक्ष्मी अग्रवाल

2005मध्ये दिल्लीतील मध्यमवर्गीय कुटुंबात राहणाऱ्या लक्ष्मी अग्रवालचे जीवन बदलले जेव्हा तिच्यावर अ‍ॅसिड हल्ला करण्यात आला. 16 वर्षांच्या लक्ष्मीला तिच्या मैत्रिणीच्या भावानं लग्नाची मागणी घातली होती. पण नकार मिळाल्यानं त्यानं लक्ष्मीवर अ‍ॅसिड फेकून तिचा चेहरा विद्रूप केला. अ‍ॅसिड हल्ल्यामुळे चेहरा विद्रुप झाला मात्र यामुळे निराश न होता लक्ष्मीनं 2006मध्ये जनहित याचिकेद्वारे अ‍ॅसिड हल्ला पीडितांसाठी विशेष कायदे असावेत अशी मागणी केली. अंगावर अ‍ॅसिड फेकण्याचा उल्लेख असलेले कलम सध्याच्या फौजदारी कायद्यात आणि दंडसंहितेत असावे यासाठी आवश्यक दुरुस्त्या कराव्यात, अशा मागण्या तिनं न्यायपीठापुढे मांडल्या. तिच्या मागणीला यश आलं 2013मध्ये केंद्र सरकारने विशेष कायदा आणला.

First published: December 10, 2019, 2:03 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading