कंगनाच्या बहिणीवरही झाला होता भीषण अॅसिड अटॅक; दीपिकाला पाठिंबा देण्याचं कारण आलं पुढे

कंगनाच्या बहिणीवरही झाला होता भीषण अॅसिड अटॅक; दीपिकाला पाठिंबा देण्याचं कारण आलं पुढे

अ‍ॅसिड हल्ल्यानंतर 5 वर्षं... 54 शस्त्रक्रिया कराव्या लागलेल्या कंगना रणौतच्या बहिणीनं रंगोली चंदेलनं स्वतःच ही कहाणी सोशल मीडियावर शेअर केली होती.

  • Share this:

मुंबई, 09 जानेवारी : बॉलिवूडमध्ये नेहमीच वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहणारी अभिनेत्री कंगना रणौत फार कमी वेळा एखाद्या व्यक्तीचं कौतुक करताना दिसत. कंगना सध्या तिचा आगमी सिनेमा पंगाच्या प्रमोशनमध्ये बीझी आहे. मात्र तरीही तिनं दीपिका पदुकोणचा सिनेमा छपाकचं कौतुक केलं आहे आणि ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करत दीपिका आणि मेघना गुलजार यांना शुभेच्छा दिल्या आहे. याशिवाय याआधी कंगनाची बहिण रंगोलीनं सुद्धा छापाक ट्रेलर रिलीज झाल्यावर दीपिकाचं कौतुक केलं होतं.

कंगनाचा हा व्हिडीओ बहीण रंगोलीनं तिच्या ट्वीटर अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात कंगना म्हणाली, ‘मी छपाक सिनेमाचा ट्रेलर पाहिला. हा ट्रेलर पाहिल्यावर मला माझी बहीण रंगोलीची आठवण आली. तिच्यासोबत घडलेला तो अपघात तिच्यावर झालेल्या अ‍ॅसिड हल्ल्याच्या आठवणी ताज्या झाल्या. माझ्या बहीणीनं त्यानंतर जी हिंमत दाखवली ती मला प्रेरित करते. आयुष्यातल्या प्रत्येक समस्येशी सामना करण्याची ताकद देते. तिचं हसणं मला प्रत्येक दुःखाशी लढण्याची हिंमत देते.'

एकाही 'हीरो'नं नाही तर, 'या' अभिनेत्रींनी दीपिकाला दिला पाठिंबा

कंगना पुढे म्हणाली, 'आज मी दीपिका आणि मेघना गुलजार यांचे आभार मानते कारण त्यांनी त्यांनी या मुद्द्यावर सिनेमाची निर्मिती केली. ज्यामुळे त्या मुलींना त्याच्या आयुष्यात हिंमत मिळेल. हा सिनेमा त्या लोकांना मिळालेली चपराक आहे. जे त्यांच्या कामात यशस्वी झाले पण ज्यासाठी त्यांनी हे केलं होतं तो त्यांची हेतू मात्र पूर्णत्वास जाऊ शकला नाही. आज या सिनेमामुळे त्या प्रत्येक चेहऱ्यावर हसू असेल ज्यांनी अ‍ॅसिड हल्ला करुन या मुलींचा चेहरा खराब केला होता. आशा करते की या नव्या वर्षात अ‍ॅसिड विक्रीवर बंदी यावी ज्यामुळे आपला देश अ‍ॅसिड हल्ल्यापासून मुक्त होऊ शकेल.’

कंगना रनौतची बहीण आणि तिची मॅनेजर रंगोली चंडेल ही अ‍ॅसिड अटॅक व्हिक्टिम होती. काही दिवसांपूर्वी तिने स्वतःच शेअर केलेल्या धक्कादायक फोटोंतून तिची भीषण कहाणी उलगडली. रंगोली इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये शिकताना ही घटना घडली. ट्विटरवर रंगोलीने शेअर केलेल्या पोस्टमधून नेमकं काय घडलं आणि या धक्क्यातून आपण कसे बाहेर आलो हे तिने सांगितलं आहे. सोशल मीडियावर रंगोलीने काही दिवसांपूर्वी आपले जुने फोटो शेअर केले होते. त्यावर काही यूजर्सने आणखी फोटो शेअर कर असं सांगितलं.

कंगनाची बहीण रंगोली चंडेल हिने दोघींचा हा लहानपणचा फोटो शेअर केला आणि त्यावर यूजर्सनी आणखी फोटो शेअर कर असं सांगितलं. त्यानंतर रंगोलीने आपले आणखी काही फोटो शेअर केले. कॉलेजमध्ये असतानाचा एक फोटो शेअर केल्यानंतर तिने लिहिलं की, "हा फोटो काढल्यानंतर काही वेळातच माझ्यावर अ‍ॅसिड अटॅक झाला होता." हे धक्कादायक वास्तव रंगोलीनेच सांगितल्यानंतर हा हल्ला कसा झाला, तिला काय काय सोसावं लागलं ते समोर आलं.

#BoycottChhapaak नंतर आता #TanhajiChallenge; दीपिकाच्या अडचणी वाढल्या

कंगनावरही झाला होता हल्ला

"मी त्या मुलाच्या प्रपोजलला नकार दिल्यावर त्यानं एक लीटर अ‍ॅसिड माझ्या चेहऱ्यावर उडवलं. मला 54 सर्जरी कराव्या लागल्या. आणि त्याच वेळी माझी बहीण कंगनाला काही कारण नसताना अक्षरशः जीवघेणी मारहाण करण्यात आली", असं रंगोलीने लिहिलं आहे.

रंगोली त्या वेळी डेहराडूनमध्ये होती. इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये शिकत होती, तेव्हाची ही घटना आहे. "माझ्या चेहऱ्याचं काय होणार, सौंदर्य हरपलं म्हणून अनेक लोक हळहळ व्यक्त करतात. पण त्या वेळी हे प्रश्न गौण होते. तुमचे अवयव त्या अ‍ॅसिडमध्ये तुमच्या डोळ्यांदेखत अक्षरशः विरघळतात तेव्हाचं दुःख मोठं असतं. 5 वर्षांच्या काळात केलेल्या 54 शस्त्रक्रियांनंतरही डॉक्टर माझा कान वाचवू शकले नाहीत. या हल्ल्यात माझा एक डोळा गेला. रेटिना ट्रान्स्प्लांट केल्यानंतर माझी दृष्टी परत मिळाली. माझ्या शरीराच्या अनेक भागांवरची त्वचा काढून चेहरा वाचवला गेला. एवढंच नाही तर माझा एक स्तनसुद्धा वाईट पद्धतीने खराब झाला होता. त्यासाठीही प्लास्टिक सर्जरी करावी लागली. माझ्या प्रिथूला ब्रेस्ट फीडिंग करताना खूप गुंतागुंत उद्भवली होती", असं रंगोलीने लिहिलं आहे.

रंगोलीने केलेल्या ट्वीट सीरिजमध्ये तिने या कठीण प्रसंगात कुटुंबीयांनी साथ दिली त्याचा उल्लेख केल आहे. आपल्या नवऱ्याचाही उल्लेख केला आहे.

अक्षय कुमार वादाच्या भोवऱ्यात, निरमाच्या जाहिरातीवरुन शिवप्रेमींनी केली ‘धुलाई’

"मी तर जगायची आशाच सोडली होती. माझा आताचा नवरा आणि तेव्हा फक्त मित्र असलेल्या या माणसाने माझ्या जखमा धुतल्या. त्यावर फुंकर घातली. तो ऑपरेशन थिएटरबाहेर तासनतास थांबायचा..." असं तिने लिहिलं आहे.

"या धक्क्यातून बाहेर यायला माझ्या छोट्या बहिणीने - कंगनाने मदत केली, हेही रंगोली लिहिते."

त्या हल्लेखोराला शिक्षा व्हावी म्हणून प्रयत्न का करत नाहीस, असं एका यूजरने विचारल्यावर रंगोली सांगते, 'आता माझा प्राधान्यक्रम वेगळा आहे. माझा नवरा आणि मुलगा यांच्याऐवजी त्या गुन्हेगाराच्या मागे लागावं असं मला वाटत नाही.'

Published by: Megha Jethe
First published: January 9, 2020, 8:32 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading