Chhapaak Box Office Collection Day 2: दीपिकाच्या छपाकनं दुसऱ्या दिवशीही दाखवला दम, केली इतक्या कोटींची कमाई

Chhapaak Box Office Collection Day 2: दीपिकाच्या छपाकनं दुसऱ्या दिवशीही दाखवला दम, केली इतक्या कोटींची कमाई

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या चित्रपटाने पहिल्या दिवसाच्या तुलनेत दुसर्‍या दिवशी उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

  • Share this:

मुंबई, 12 जानेवारी : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या चित्रपटाने पहिल्या दिवसाच्या तुलनेत दुसर्‍या दिवशी बॉक्स ऑफिसवर (छपक बॉक्स ऑफिस कलेक्शन) उत्कृष्ट कामगिरी केली आहे. दीपिकाचया छापकनं पहिल्या दिवशी 4.77 कोटींची कमाई केली होती. तर, दुसर्‍या दिवशी चित्रपटानं तब्बल 30-40 टक्के वाढ करत 6 कोटींच्यावर कमाई केली आहे. त्यानुसार दीपिका पदुकोणच्या 'छपाक' चित्रपटाने दोन दिवसांत सुमारे 11 कोटींची कमाई केली आहे. बॉक्स ऑफिस इंडियाने या चित्रपटाच्या कमाईची माहिती दिली आहे.

दीपिका पादुकोणच्या 'छपाक' चे बजेट सुमारे 35 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. 'छापाक' ची कथा मालती म्हणजेच अ‍ॅसिड हल्ला पीडिता लक्ष्मी अग्रवालच्या हिच्या जीवनावर आधारित आहे. दरम्यान, या सिनेमा प्रदर्शित होण्याआधी अनेक वादात सापडला होता.

वाचा-बॉक्स ऑफिसवर 'तानाजी'चा धुमाकूळ, आता उदयनराजेंना अजय देवगणकडून 'ही' अपेक्षा

दीपिकानं नवी दिल्लीतील जेएनयू हिंचारानंतर विद्यार्थ्यांची भेट घेतली होती. त्यानंतर छपाकवर बंदी घालण्याची मागणी काही चाहत्यांनी ट्विटरवर केली होती. त्यातूनच सोशल मीडियावर #BoycottChhapaak ट्रेंड होत होता. त्याचा फटका दीपिकाला पहिल्या दिवशी बसला. त्यामुळं अप्रत्यक्षरित्या या सगळ्याचा फायदा तानाजी सिनेमाला झाला. एवढेच नाही तर, काँग्रेस प्रशासित तीन राज्यांनी छपाक या दीपिका पदुकोणच्या चित्रपटाला अगोदरच करमुक्त करण्याची घोषणा केली आहे.

वाचा-दीपिकाच्या अडचणीत वाढ, ‘हा’ आदेश न पाळल्यास छपाक दिसणार नाही चित्रपटगृहात

चित्रपटगृहात दिसणार नाही छपाक?

छपाक सिनेमाची कहानी आधारित असलेल्या अ‍ॅसिड हल्ला पीडित लक्ष्मी अग्रवाल यांच्यात वकील अपर्णा भट्ट यांनी श्रेय न दिल्याप्रकरणी याचिका दाखल केली होती. आता दिल्ली हाय कोर्टानं वकील अपर्णा भट्ट यांना श्रेय देण्याच्या प्रकरणात फॉक्स स्टुडिओची याचिका फेटाळून लावली आहे. या याचिकेवर सुनावणी करताना दिल्ली उच्च न्यायालयाने पटियाला हाऊस कोर्टाच्या निर्णयाला न्याय्य ठरविले आहे. मुळे हाय कोर्टाच्या निर्णयानंतर चित्रपट निर्मात्याला आता वकील अपर्णा भट्ट यांना श्रेय द्यावे लागणार आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले आहे की अपर्णा भट्ट यांना श्रेय न दिल्यास 15 जानेवारीपासून चित्रपटगृहात सिनेमा दिसणार नाही. तर, 17 जानेवारीपासून इतर ठिकाणी बंदी घातली जाईल.

वाचा-छपाक Vs तानाजी, पहिल्या दिवशी कुणी केली जास्त कमाई?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 12, 2020 12:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading