नामांकित अभिनेता कोरोनामुळं झाला बेरोजगार; घर खर्चासाठीही नाहीत पैसे

नामांकित अभिनेता कोरोनामुळं झाला बेरोजगार; घर खर्चासाठीही नाहीत पैसे

चेतन हंसराज हा टीव्हीवरील एक नामांकित अभिनेता म्हणून ओळखला जातो. पण आज मित्रांना वाढदिवसाची पार्टी देण्यासाठी देखील त्याच्याकडे नाहीत पैसे

  • Share this:

मुंबई 14 जून: कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळं सध्या देशभरातील सर्वच लोक त्रस्त आहेत. (Coronavirus) लोकांचं आयुष्य विस्कळीत झालं आहे. अगदी फिल्मी दुनियेत काम करणाऱ्या मंडळींना देखील कोरोनाचा जोरदार फटका बसला आहे. चेतन हंसराज (Chetan Hansraj) हा त्यातीलच एक अभिनेता. आज चेतनचा वाढदिवस आहे. (Chetan Hansraj birthday) पण मित्रांना वाढदिवसाची पार्टी देण्यासाठी देखील त्याच्याकडे पुरेसे पैसे नाहीत. कधीकाळी टीव्हीवरील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक म्हणून चर्चेत राहिलेला हंसराज आज कोरोनामुळं बेरोजगार झाला आहे.

भाग्यश्री मोटेनं सांगितलं आपल्या आयुष्यातील सर्वात मोठं गुपित; चाहत्यांना बसला धक्का

क्यो होता है प्यार या सुररहिट मालिकेतून घराघरात पोहोचलेला चेतन हा छोट्या पडद्यावरील एक नामांकित अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्यानं शूssss कोई है, सीआडी, कैसा ये प्यार है, कुटुंब, कहानी हमारे महाभारत की यांसारख्या अनेक मालिकांमध्ये महत्वाच्या व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. प्रामुख्यानं त्याच्या खलनायिका भूमिका प्रचंड गाजल्या होता. 2000 च्या दशकात तर तो टीव्हीवरील सर्वाधिक व्यस्त कलाकारांपैकी एक होता. परंतु आज तो बेरोजगार म्हणून घरात बसला आहे. तो सध्या आर्थिक संकटात असून त्याच्याजवळ मित्रांना वाढदिवसाची पार्टी देण्यासाठी देखील पैसे नाहीत.

ड्रग्ज प्रकरणी झाली होती अटक; बाहेर पडताच अभिनेत्रीनं केलं BOLD फोटोशूट

आलिकडेच न्यूज ट्रॅकला दिलेल्या मुलाखतीत हंसराजनं आपल्या सद्य परिस्थितीवर भाष्य केलं होतं. तो म्हणाला, “कोरोनामुळं मी देखील इतर कलाकारांप्रमाणेच घरात बसलो आहे. माझ्याकडे सध्या काहीही काम नाही, कोरोनापूर्वी जे काही काम केलं होतं त्याचे पैसे अद्याप मिळालेले नाहीत. या प्रकारामुळं मी सध्या आर्थिक संकटात आहे. जे सेव्हिंग होतं त्यामधून कर्जाचे हफ्ते आणि घर चालवत आहे. पण हा प्रकार किती वेळ चालेल सांगता येत नाही.” वाढदिवसाच्या निमित्तानं हंसराजच्या चाहत्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. शिवाय तो पुन्हा एकदा टीव्हीवर काम करताना दिसेल अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.

Published by: Mandar Gurav
First published: June 15, 2021, 7:00 AM IST

ताज्या बातम्या