Home /News /entertainment /

चेतन भगतने केलं बॉलिवूडचं समर्थन; म्हणाला, 'हे नष्ट केलं तर आपण भारतातील एक...'

चेतन भगतने केलं बॉलिवूडचं समर्थन; म्हणाला, 'हे नष्ट केलं तर आपण भारतातील एक...'

चेतन भगत नेहमी सद्यस्थितीबाबत आपले विचार थेटपणे व्यक्त करीत असतो.

  नवी दिल्ली, 29 सप्टेंबर : प्रसिद्ध लेखक चेतन भगत (Chetan Bhagat) सध्या सोशल मीडियावर खूप सक्रिय असल्याचे दिसून येत आहे. त्याने लिहिलेल्या पुस्तकांसह तो आपल्या थेट व स्पष्ट विचारासाठीही ओळखला जातो. तो अनेकदा सद्यस्थितीवरील एखादा मुद्द्यावर आपले विचार सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करतो. त्याने बॉलिवूडमध्ये सुरू असलेल्या हालचालींबाबत एक ट्विट केलं आहे. अनेकांनी यावर प्रतिक्रिया देत आपलं मत व्यक्त केलं आहे. त्याने ट्विटमध्ये लिहिलं आहे की, बॉलिवूडला संपवणं म्हणजे भारतात चांगल्या प्रकारे काम करणाऱ्या संघटनेला संपवण्यासारखं आहे. चेतन भगत याचं हे ट्विट खूप व्हायरल झालं आहे. चेतन भगत (Chetan Bhagat) याने आपल्या ट्वीटमध्ये बॉलिवुडला संपवण्याच्या मुद्द्यावर ट्विट करीत लिहिलं आहे की, बॉलिवुड भारतातील त्या गोष्टींपैकी एक आहे जे चांगलं करीत आहेत. येथून कर, नोकरी, आणि आनंद मिळतो. बॉलिवूडमधून ड्रग्ज संपवणं चांगली गोष्ट आहे. मात्र या प्रक्रियेत जर आपण बॉलिवूडला नष्ट केलं तर आपण भारतातील ती गोष्ट नष्ट करू जी आपल्या क्षेत्रात खूप चांगलं काम करीत आहे. चेतन भगत याने आणखी अनेक ट्विट्स केले आहेत. हे ही वाचा-श्रद्धा, दीपिका, साराच्या अडचणीत वाढ; मोबाइलसह 'या' गोष्टीतून सत्य उलगडणार
  हे ही वाचा-...म्हणून दिलीप कुमारच्या पत्नी सायरा बानोंनी पाकिस्तान सरकारचं केलं कौतुक चेतन भगतने (Chetan Bhagat) गोश्एक ट्विटमध्ये म्हटलं आहे की, "एक समाज जो आपल्या कलाकारांना नष्ट होऊ देतो. शेवटी तो त्याची आत्मा नष्ट करतो. गेल्या अनेक दिवसांपासून ड्रग्ज प्रकरणामुळे बॉलिवूड सातत्याने चर्चेत आहे. सुशांत सिंह राजपूत प्रकरणातील ड्रग्ज कनेक्शनच्या तपासादरम्यान दीपिका पदुकोण, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह आणि श्रद्धा कपूरसारख्या अनेक कलाकारांची नावं समोर आली आहेत. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रणौतदेखील सातत्याने बॉलिवूडला बुलीवुड म्हणत सातत्याने टीका करीत आहे.
  Published by:Meenal Gangurde
  First published:

  Tags: Bollywood

  पुढील बातम्या