'हाफ गर्लफ्रेंड'मुळे चेतन भगतला मागावी लागली माफी

'हाफ गर्लफ्रेंड'मुळे चेतन भगतला मागावी लागली माफी

चेतन भगतची 2014 साली हाफ गर्लफ्रेंड नावाची एक कादंबरी आली होती. ही कादंबरी तुफान गाजली. या कादंबरीचा नायक बिहार च्या डुमराव राजघराण्याचा होता

  • Share this:

08 जून : आपल्या पुस्तकांनी तरूणांची मने जिंकणाऱ्या चेतन भगतला चक्क माफी मागावी लागलीय. आता चेतननी असं काय केलं की त्याला माफी मागावी लागली? ते ही पेपरात माफीनामा देऊन?

चेतन भगतची 2014 साली हाफ गर्लफ्रेंड नावाची एक कादंबरी आली होती. ही कादंबरी तुफान गाजली. या कादंबरीचा नायक बिहार च्या डुमराव राजघराण्याचा होता. तर या पुस्तकात या राजघराण्याला अत्यंत चुकीच्या प्रकारे दाखवले गेले असे राजघराण्याचे म्हणणे आहे.

या पुस्तकात या घराण्यातील पुरूषांना मद्यपी दाखवल्यामुळे त्यांचा अपमान झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. म्हणूनच त्यांनी 2016 साली चेतन भगतविरोधात एक कोटीचा मानहानीचा दावा ठोकला.

याच केस ची आऊट आॅफ कोर्ट सेटलमेंट 31मे रोजी झाली. त्यानुसार चेतन भगतला 15 जुनच्या आत 2 वर्तमानपत्रात माफीनामा प्रकाशित करावा लागेल. त्यातले एक वर्तनमानपत्र हिंदी असावे आणि डुमरावमध्ये मिळत असावे.

तर चेतनने असा माफीनामा छापलाही. त्यात त्याची कादंबरी केवळ कल्पित असून त्याचा वास्तवाशी काही संबंध नाही असे त्याचे म्हणणे आहे. तरीही त्यांना झालेल्या त्रासासाठी तो क्षमाप्रार्थी आहे असे त्याने नमूद केले आहे.

डुमराव घराणे कादंबरीत वापरणे चेतनला चांगलेच महागात पडले तर.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 8, 2017 08:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading