S M L

VIDEO : चेतन भगतच्या नव्या पुस्तकाचा फिल्म स्टाईल प्रोमो पाहिलात का?

लेखक चेतन भगत यांनी आपल्या नव्या पुस्तकाचं ट्रेलर लाँच केलं. गर्ल इन रूम 105 : अॅन अनसाॅल्व्ह स्टोरी ( Girl in Room 105: An Unlove story) असं या पुस्तकाचं नाव आहे.

Sonali Deshpande | Updated On: Sep 5, 2018 01:15 PM IST

VIDEO : चेतन भगतच्या नव्या पुस्तकाचा फिल्म स्टाईल प्रोमो पाहिलात का?

मुंबई, 5 सप्टेंबर : एखाद्या नव्या पुस्तकाचा प्रोमो कधी पाहिलात का? आणि तोही व्हिडिओ प्रोमो? लेखक चेतन भगत यांनी आपल्या नव्या पुस्तकाचं ट्रेलर लाँच केलं. गर्ल इन रूम 105 : अॅन अनसाॅल्व्ह स्टोरी ( Girl in Room 105: An Unlove story) असं या पुस्तकाचं नाव आहे. हे लाँचिंग फेसबुक लाईव्हही होतं.

Loading...
Loading...

या पुस्तकाबद्दल बोलताना चेतन भगत म्हणाले, ' यावेळी मी टिपिकल चेतन भगत लव्ह स्टोरीपासून लांब गेलोय. ही लव्ह स्टोरी नाही. अनलव्ह स्टोरी आहे. आपण अनेकदा एखाद्याला आपल्या प्रेमातून दूर सारतो. तशीच ही कथा आहे. '

ते पुढे म्हणाले, ' पुस्तकाचा हा प्रोमो एखाद्या सिनेमासारखा आहे. हे पहिल्यांदाच झालं. पण मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो, तुम्ही पुस्तक वाचा. कारण पुस्तकाचा आनंद काही वेगळाच असतो. '

या ट्रेलरमध्ये केशव राजपुरोहित नावाचा तरुण आहे. तो एकदम पारंपरिक विचारसरणीच्या कुटुंबातून पुढे आलाय. तो एका रात्री आपली काश्मिरी मुस्लीम असलेल्या एक्स गर्लफ्रेंडच्या झारा लोनच्या रूममध्ये जातो आणि खूप काही घडतं, अगदी अनपेक्षित असं.

हा ट्रेलर थ्रिलर आहे. ' ही कथा एका तरुणाची आहे, जो आपल्या मैत्रिणीला प्रेमातून बेदखल करतो आणि एका मोठ्या गोष्टीत अडकतो,' चेतन भगत सांगतात.

या ट्रेलरमध्ये विक्रांत मॅसीनं काम केलंय. मोहित सुरीनं त्याचं दिग्दर्शन केलंय. चेतन भगतच्या पुस्तकावर बेतलेल्या हाल्फ गर्लफ्रेंड सिनेमाचं दिग्दर्शन मोहितनं केलं होतं. नायकाचं नाव केशव आहे आणि पुस्तकाचं प्रकाशनही कृष्ण जन्माष्टमीला झालं.

चेतन भगतचं हे नवं पुस्तक 9 आॅक्टोबरला मिळणार आहे. त्याआधी आॅनलाईन बुक करता येईल.

Teacher's Day : असे फिल्मी शिक्षक खऱ्या आयुष्यात भेटले तर?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 5, 2018 01:15 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close