Home /News /entertainment /

आता येणार ‘चेन्नई एक्स्प्रेस’चा सिक्वेल, रोहित शेट्टीची 'या' बहुचर्चित जोडीला पसंती

आता येणार ‘चेन्नई एक्स्प्रेस’चा सिक्वेल, रोहित शेट्टीची 'या' बहुचर्चित जोडीला पसंती

सूर्यवंशीनंतर रोहित शेट्टी त्याच्या इतर सिनेमांच्या सिक्वेलचाही विचार करत आहे. ज्यात सुपरहिट सिनेमा 'चेन्नई एक्स्प्रेस'चा समावेश आहे.

  मुंबई, 05 फेब्रुवारी : बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी त्याचा आगामी सिनेमा 'सूर्यवंशी'मुळे खूप चर्चेत आहे. रोहित शेट्टीच्या बहुचर्चित कॉप सीरिजमधील सूर्यवंशी हा चौथा सिनेमा आहे. याआधी रोहितनं अजय देवगण आणि रणवीर सिंहला घेऊन कॉप सिनेमांची निर्मिती केली आहे. त्यानंतर आता अक्षय कुमार आणि कतरिना कैफ यांच्या मुख्य भूमिका असलेला सूर्यवंशी लवकरच प्रेक्षकांच्या भूमिका येणार आहे. अशाचत आता रोहित शेट्टी त्याच्या काही इतर सिनेमांच्या सिक्वेलचाही विचार करत आहे. ज्यात त्याचा सुपरहिट सिनेमा 'चेन्नई एक्स्प्रेस'चा समावेश आहे. रोहित शेट्टीनं नुकतीच नेहा धुपियाच्या चॅट शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्याच्या काही सिनेमांचा सिक्वेल बनवणार असल्याचं सांगितलं ज्यात दीपिका पदुकोण आणि शाहरुख खान यांच्या 'चेन्नई एक्स्प्रेस'चा समावेश आहे. याशिवाय या सिनेमात त्यांनं बी टाऊनमधल्या सुपरहिट आणि बहुचर्चित जोडीला साइन करण्याचा विचार करत असल्याचंही म्हटलं आहे. पण या सिनेमाची कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. 'आई-बाबा वेगळे झाले हे योग्यच झालं', सारा अली खानची धक्कादायक प्रतिक्रिया
  नेहा धुपियाच्या चॅट शोमध्ये रोहितला 'चेन्नई एक्स्प्रेस2'च्या लीड कास्टसाठी कोणाला साइन करशील असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यानं सारा अली खान आणि कार्तिक आर्यन यांचं नाव घेतलं. सारा आणि कार्तिक यांचा ‘लव्ह आजकल’ हा सिनेमा 14 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पण ही जोडी सिनेमाच्या रिलीज अगोदरच त्यांच्या पर्सनल लाइफमुळे चर्चेत आहे. सोशल मीडियावरही या दोघांच्या नात्याची चर्चा सुरू असते. अर्जुनच्या प्रेमात आकंठ बुडाली आहे मलायका, पाहा रोमँटिक VIDEO
  सारा आणि कार्तिकच्या मुख्य भूमिका असलेला ‘लव्ह आजकल’ हा सिनेमा 2009 मध्ये आलेल्या सैफ अली खान आणि दीपिका पदुकोणच्या 'लव्ह आजकल'चा दुसरा भाग आहे. या सिनेमाचं दिग्दर्शनही इम्तियाज अली यांनी केलं आहे. या सिनेमात कार्तिक आणि सारा अली खान यांच्यासोबत रणदीप हुड्डा, आरुषी शर्मा आणि श्वेता पड्डा यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. दिशाचं 'हे' प्रेम तुम्हाला माहित आहे का? भारताच्या युवा खेळाडूबद्दल म्हणते...
  Published by:Megha Jethe
  First published:

  Tags: Bollywood, Kartik aryan, Rohit Shetty, Sara ali khan

  पुढील बातम्या