'झीरो' सिनेमासोबत मिळणार आणखी एक सरप्राईझ

'झीरो' सिनेमासोबत मिळणार आणखी एक सरप्राईझ

झीरो हा एक रोमँटिक ड्रामा चित्रपट आहे. ज्यात शाहरुख खानने लहान उंचीच्या माणसाची व्यक्तीरेखा साकारली आहे. प्रत्येकवेळी आपल्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनात छाप पाडणारा कलाकार शाहरूख खान यावेळीसुद्धा प्रेक्षकांची मनं जिंकेल असा विश्वास निर्मात्यांना आहे.

  • Share this:

मुंबई, 20 डिसेंबर : इम्रान हाश्मीच्या 'चिट इंडिया'ची खूप चर्चा आहे. या सिनेमाचं ट्रेलर आता झीरो सिनेमासोबत प्रेक्षकांना पाहता येईल. इम्रान आणि किंग खान यांचं नातंही असंच स्ट्राँग आहे. शाहरुखची निर्मिती असलेल्या बार्ड आॅफ ब्लड या नेटफ्लिक्सच्या मेगासीरिजमध्ये इम्रान काम करतोय.

आॅनलाईनवर या ट्रेलरला मोठा प्रतिसाद मिळालाय. त्यामुळेच टी सीरिज, एलिपसिस एन्टरटेन्मेंट आणि इम्रान हाश्मीचा सिनेमा चिट इंडिया सिने रसिकांचं कौतुक मिळवण्यासाठी सज्ज झालाय. त्याचा ट्रेलर शाहरुखचा झीरो सुरू होण्याआधी भारतभरच्या प्रेक्षकांना पाहता येईल.

टी सीरिज आणि शाहरुखचं नातंही जुनंच आहे. शिवाय झीरो सिनेमाचे म्युझिक राइट्स टी सीरिजकडे आहेत. इम्रान शाहरुखचीच नेटफ्लिक्सची सीरिज बार्ड आॅफ ब्लडमध्ये काम करतोय. त्यामुळेच सर्व काही जुळून आलंय.

रेड चिलीनं चिट इंडियाचं ट्रेलर झीरो सिनेमाला जोडण्याचं मान्य केलंय. चिट इंडिया येत्या 25 जानेवारीला रिलीज होईल. तेही बदला सिनेमाचा ट्रेलर जोडणार आहेत. बदलामध्ये अमिताभ बच्चन आहेत. सुजाॅय घोषचं दिग्दर्शन आहे.

सिनेमाचे सहनिर्माते विनोद भानुशाली म्हणाले, 'रेड चिलीनं चिट इंडियाचा ट्रेलर झीरोला अॅटॅच करायचं मान्य केलं. या ट्रेलरला आॅनलाइन प्रतिसाद प्रचंड मिळालाय. त्यामुळे आता प्रेक्षकांना थिएटरमध्येही याचा आनंद घेता येईल.'

झीरो हा एक रोमँटिक ड्रामा चित्रपट आहे. ज्यात शाहरुख खानने लहान उंचीच्या माणसाची व्यक्तीरेखा साकारली आहे. प्रत्येकवेळी आपल्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनात छाप पाडणारा कलाकार शाहरूख खान यावेळीसुद्धा प्रेक्षकांची मनं जिंकेल असा विश्वास निर्मात्यांना आहे. चित्रपटात अभिनेत्री अनुष्का शर्मा ही नायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. ती दिव्यांग आहे. कतरिना कैफ सेलिब्रिटी हिरोईनची भूमिका साकारत आहे.

त्याचबरोबर सिनेमात भाईजान सलमानसोबत काजोल, राणी मुखर्जी, दीपिका पादुकोण, जुही चावला, करिष्मा कपूर,  आर माधवन आणि आलिया भट्ट हे पाहुणे कलाकार असणार आहेत. विशेष म्हणजे पाहुणे कलाकार श्रीदेवी सुद्धा आपल्या दिसणार आहे.

उंचीने लहान असणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यावर आधारित झिरो चित्रपट आहे. 1989 रोजी कमल हसनने ’अप्पू राजा’ सिनेमातून अशा बुटक्या माणसाची भूमिका साकारली होती. त्यानंतर 31 वर्षांनी असा वेगळा प्रयोग ‘झिरो’ चित्रपटातून तयार करण्यात आला आहे.

सलमान आणि शाहरुख ही बॉलिवूडची करण- अर्जुन जोडी या सिनेमात दिसणार आहे. निर्मात्यांनी ही युएसपी जाणत सिनेमाच्या टीझरची सुरूवातच दोघांच्या दमदार एण्ट्रीपासून केली. वर्षभरापासून प्रश्नात पाडणाऱ्या टीझरपेक्षा चित्रपटाच्या पोस्टरने आणखी उत्सुकता वाढवली आहे.

First published: December 20, 2018, 4:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading