छत्रीवालीच्या आयुष्यात मोठा ट्विस्ट, मधुरा काय घेणार निर्णय?

छत्रीवालीच्या आयुष्यात मोठा ट्विस्ट, मधुरा काय घेणार निर्णय?

स्टार प्रवाहवरील छत्रीवाली मालिका नावाप्रमाणेच हटके आहे. मालिकेची नायिका मधुराभोवतीच बऱ्याच घटना घडत असतात. आता या मालिकेत एक वेगळं वळण येणार आहे.

  • Share this:

मुंबई, 22 आॅक्टोबर : स्टार प्रवाहवरील छत्रीवाली मालिका नावाप्रमाणेच हटके आहे. मालिकेची नायिका मधुराभोवतीच बऱ्याच घटना घडत असतात. आता या मालिकेत एक वेगळं वळण येणार आहे. मालिकांचा टीआरपी शाबूत ठेवण्यासाठी बऱ्याच धडपडी कराव्या लागतात. आजही टीआरपी रेटिंगमध्ये पहिल्या पाच मालिकांमध्ये झी मराठीच्याच मालिका आहेत. त्यामुळे इतरांना काही ना काही वळणं आणावी लागतात.

छत्रीवाली अर्थात मधुराच्या आयुष्यातही प्रेमाची चाहूल लागलीय. विक्रमने आपल्या प्रेमाची कबुली मधुरासमोर दिलीय खरी पण आता प्रतीक्षा आहे ती मधुराच्या होकाराची. मधुरा विक्रमच्या प्रेमाचा स्वीकार करणार का याची उत्सुकता नक्कीच आहे. पण मधुराच्या प्रेमाचा तिची आई स्वीकार करणार का? हा गुंतागुंतीचा प्रश्न आहे.

कारण मधुराच्या आईला हवाय मधुराची काळजी घेणारा आणि मनाने श्रीमंत असणारा जावई. विक्रमचा स्वभाव याच्या नेमका उलट आहे. त्यामुळे मधुरासोबतच विक्रमला मधुराच्या आईचंही मन जिंकावं लागणार आहे. आता मधुरासाठी विक्रम स्वत:ला बदलणार? की मधुरासाठी आईला आपला निर्णय बदलावा लागणार? अशी धमाकेदार गोष्ट 'छत्रीवाली'च्या पुढच्या काही भागांमध्ये पाहायला मिळणार आहे.

छत्रीवाली' मालिकेतील मधुरा म्हणजेच नम्रता प्रधानने काही दिवसांपूर्वी नवरात्रौत्सवाच्या शुभेच्छा देत, महिलांनी स्वावलंबी होणं गरजेचं आहे हा मुद्दा अधोरेखित केला होता. संसाराचा गाडा सांभाळताना मुलांचं संगोपन करणारी, नोकरी करून घराला आधार देणारी 'ती' ही कर्ती स्त्रीच असते असं मधुराला वाटतं. या कर्त्या स्त्रीचा सन्मान हा व्हायलाच हवा असं मत नम्रताने व्यक्त केलंय. 'छत्रीवाली' मालिकेमधून मधुराच्या रूपात हीच कर्ती स्त्री साकारण्याची संधी मिळाल्याचा आनंदही नम्रताने या निमित्ताने व्यक्त केलाय.

दीपिका-रणवीरच्या लग्नपत्रिकेतल्या चुका झाल्या व्हायरल

First published: October 22, 2018, 5:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading