30 नोव्हेंबर: ती सध्या काय करतेय किंवा तो सध्या काय करतोय? हा प्रश्न पडतो तो अभिनेत्यांच्या मोठ्या झालेल्या मुलामुलींबद्दल. अनेक प्रेक्षकांना आपल्या आवडत्या स्टार्सच्या कुटुंबाबद्दल जाणून घ्यायची इच्छा असते. चंकी पांडेची तरुण मुलगी अनन्या पांडेही नृत्यात रमलीय.
पॅरिसमधील 'बॅल दे डेब्युटन्ट्स' या कार्यक्रमात अभिनेता चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडेनी पदार्पण केलं. या कार्यक्रमाला 'ली बॅल' असं म्हटलं जातं. तसंच या कार्यक्रमात अनन्यासोबतच तिचा चुलत भाऊ अहान पांडेही सहभागी झाला होता.
एवढंच नव्हे तर चंकी पांडे आणि भावना पांडेही या कार्यक्रमाला उपस्थित होते. अनन्या या कार्यक्रमात ब्लॅक आणि गोल्डन रंगाच्या ड्रेसमध्ये अगदी उठून दिसत होती. याच कार्यक्रमादरम्यानचे फोटो भावना पांडे यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केलेत.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा