मुंबई, 26 मे: सध्या मराठी सिनेसृष्टीत एकाच अभिनेत्रीची चर्चा आहे ती म्हणजे अभिनेत्री अमृता खानविलकर (amruta khanvilkar) हिची. चंद्रमुखी (Chandramukhi Film) सिनेमात मुख्य भूमिका साकारुन अमृताने चाहत्यांना मनावर राज्य केलं आहे. चंद्रमुखी आणि दौलतराव यांची प्रेम कहाणी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. आदिनाथ आणि अमृताची जोडी प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली. अमृता आजही विदेशात जाऊन चंद्रमुखी सिनेमाचं प्रमोशन करत आहेत. चंद्रमुखी सिनेमावर आजही हाऊसफुल्लचा बोर्ड झळकत आहे. पण एकीकके अमृताच्या चंद्रमुखी सिनेमाची चर्चा आहे तर दुसरीकडे मात्र अमृताच्या लग्नातील घागऱ्याची चर्चा सुरू आहे (mruta khanvilkar wedding lehenga) आता अमृताचा लग्नातला घागरा मध्येच काय करतो असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. लग्नाच्या 7 वर्षांची का होतेय अमृताच्या घागऱ्याची चर्चा जाणून घ्या.
अमृताने चंद्रमुखी सिनेमाचं दणकूण प्रमोशन केलं. त्यावेळी तिने अनेकांना मुलाखतही दिल्या. चंद्रमुखी सिनेमाच्या प्रमोशनवेळी अमृताला सिनेमा विषयीही आणि तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी प्रश्न विचारले गेले त्यावेळी अमृताने तिच्या लग्नातील घागऱ्याविषयी उलगडा केला. सकाळला दिलेल्या मुलाखतीत अमृताने रॅपिड फायर गेम खेळला. या खेळात अमृताला तुझ्या कपाटतील सर्वात महागडे कपडे कोणते?असा प्रश्न विचारला. त्यावर आधी अमृतानं उत्तर देणं टाळलं पण त्यानंतर आग्रहाखातर तिनं उत्तर दिलंच. तिचा तो व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हेही वाचा -
नायक नायिका नाही तर 'हे' आजी आजोबा गाजवतायत छोटा पडदा; मराठी मालिकेतील सर्वाधिक लोकप्रिय चेहरे
व्हायरल व्हिडीओत अमृता तुझ्या कपाटतील सर्वात महागडा ड्रेस कोणता आणि कितीचा?, असा प्रश्न विचारला त्यावर अमृता म्हणली, 'माझ्या लग्नात मी घातलेला घागरा. जाऊ दे आता त्याची प्राइज नाही सांगत,प्लिज सांग असं म्हटल्यानंतर अमृता म्हणाली, '3 लाख'. अमृताने ज्या स्टाइलमध्ये हे उत्तर दिलं ती स्टाइल अनेकांना आवडली तर अनेकजण यावरुन तिला ट्रोल देखील करत आहेत.
सोशल मीडियावर अमृताचा हा व्हिडीओ व्हायरल होत असून अनेकांनी या व्हिडीओवर मिम्स देखील तयार केले आहेत. जाऊ देत आता त्याची प्राइज नाही सांगत हे अमृताचं वाक्य चांगलाच व्हायरल झालं आहे.
अमृताने 2015मध्ये हिमांशू मल्होत्रासोबत लग्न केलं. दोघांच्या लग्नाला 7 वर्ष पूर्ण झाली आहेत. हिमांशू हा हिंदी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध चेहरा असून त्याने अनेक मालिकांमधून काम केलं आहे. त्याचप्रमाणे अमृता आणि हिमांशू यांनी हिंदी टेलिव्हिजनवर एका डान्स रिअॅलिटी शोमध्ये देखील एकत्र काम केलं होतं. दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडली होती. चंद्रमुखी सिनेमावेळी देखील हिंमाशूने अमृताला शुभेच्छा देत तिच्या कामाचं कौतुक केलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.