Home /News /entertainment /

'त्याग पाहून टचकन डोळ्यात पाणी आलं' अमृता खानविलकरच्या 'त्या' पोस्टवर चाहत्याची भावुक कमेंट

'त्याग पाहून टचकन डोळ्यात पाणी आलं' अमृता खानविलकरच्या 'त्या' पोस्टवर चाहत्याची भावुक कमेंट

चंद्रमुखी सिनेमात ज्या कलावंतीणीची भूमिका साकारली त्या कलाकरांसाठी अमृतानं नुकतीच एक पोस्ट केली होती. आता या पोस्टनंतर पुन्हा अमृतानं एक नवीन पोस्ट केली आहे

  मुंबई, 25 मे - मागच्या काही दिवसांपासून सगळीकडं एकच नाव गाजतंय ते म्हणजे चंद्रा आणि फक्त चंद्रा (Chandra). प्रसाद ओक (Prasad Oak) दिग्दर्शिक आणि विश्वास पाटील (Vishwas Patil) यांच्या कांदबरीवर आधारीत चंद्रमुखी (Chandramukhi Marathi Movie) हा सिनेमा सिनेमागृहात धुमशान घालतोय.अभिनेत्री अमृता खानविलकरनं (amruta khanvilkar) या सिनेमात चंद्राची भूमिका साकारली आहे. अमृतानं साकारलेल्या चंद्राचे सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे. मुख्य भूमिका असलेला अमृताचा हा पहिला सिनेमा होता. सुरुवातीपासूनच तिनं या सिनेमासाठी मेहनत घेतली आहे. सिनेमात तिनं ज्या कलावंतीणीची भूमिका साकारली त्या कलाकरांसाठी अमृतानं नुकतीच एक पोस्ट केली होती. आता या पोस्टनंतर पुन्हा अमृतानं एक नवीन पोस्ट केली आहे.  ज्यामध्ये तिनं कलावंतीणीच आय़ुष्य किती कष्टाने भरलेले असतं हेच सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तिनं शेअर केलेला फोटो देखील हेच सांगण्याचा प्रयत्न करतो. अमृता खानविलकरनं इन्स्टावर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत अमृताच्या डोळ्यातील पाणी कलावंतीणीच्या आय़ुष्यातील त्यागाची, कष्टाची जाणीव करून देतो. तिनं हे फोटो शेअर करत म्हटलं आहे की, त्याग ... मेहनत.. जिद्द ….अन् ऐका कलावंतिणीचा साज शिंणगार लेऊन हाजीर हाय हि चंद्रमुखी तुमच्या म्होरं...तिच्या या पोस्टवर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव होत आहे. सोनालीने पहिल्यांदाच दाखविली सासरची झलक,अभिनेत्रीसाठी सासूबाईंनी केलं हे खास काम एका नेटकऱ्याने कमेंट करत म्हटलं आहे की, चंद्रा तुमचा त्याग पाहून टचकन डोळ्यात पाणी आलं! 😭😭 तर दुसऱ्याने म्हटलं आहे की, खरचं शब्द नाहीत...अमृात म्हणूनच मेहनत...जिद्द याच्या जीवावर तू लोकप्रिय झालीस. अनेकांनी तिच्या भूमिकेचे व अभिनयाचे कौतुक केलं आहे.
  लेखक विश्वास पाटील यांच्या कादंबरीवर आधारित ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट प्रसाद ओक याने दिग्दर्शित केला आहे. तर पटकथा-संवाद चिन्मय मांडलेकर याचे आहेत. या चित्रपटात दौलत या मुख्य पात्राची भूमिका आदिनाथ कोठारेने साकारली आहे. तर चंद्राच्या भूमिकेत अमृता खानविलकर आहे. अजय -अतुल यांचे दमदार संगीत या चित्रपटाला मिळाले आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment

  पुढील बातम्या