बॉलिवूडला आणखी एक धक्का; 'चलते चलते'मधील अभिनेत्याचा जगाला अलविदा

बॉलिवूडला आणखी एक धक्का; 'चलते चलते'मधील अभिनेत्याचा जगाला अलविदा

चलते चलते (chalte chalte) फिल्ममधील अभिनेते विशाल आनंद (vishal anand) यांचं निधन झालं आहे.

  • Share this:

मुंबई, 05 ऑक्टोबर : 'चलते चलते मेरे ये गीत याद रखना कभी अलविदा ना कहना', आजही प्रत्येकाच्या तोंडावर हे गाणं असतं. 'चलते चलते' (chalte chalte) फिल्ममधील हे गाणं आज या फिल्ममधील अभिनेत्याने जगाला अलविदा म्हटलं आहे. अभिनेते विशाल आनंद (vishan anand) यांचं निधन झालं आहे. दीर्घ आजारपणामुळे त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.

विशाल आनंद यांनी मोजक्याच फिल्म्स केल्या, मात्र या फिल्ममधील भूमिकांसाठी ते आजही लक्षात आहेत. 1976 साली आलेली फिल्म चलते-चलते त्यापैकीच एक आहे. या फिल्ममध्ये विशाल आनंद यांच्यासह सिमी ग्रेवाल मुख्य भूमिकेत होत्या.  या फिल्मचं टायटल साँग आजही कित्येक जण गुणगुणतात. किशोर कुमार यांनी गायलेलं हे गाणं संगीतकार बप्पी लहरी यांनी संगीतबद्ध केलं. बप्पी लहरी यांच्या करिअरने याच गाण्यामुळे टेक ऑफ घेतला.

विशाल आनंद यांनी चलते चलतेशिवाय टॅक्सी ड्रायव्हर, सा-रे-ग-म-प, दिल से मिले दिल अशा अनेक फिल्ममध्ये काम केलं. त्यांनी 11 फिल्ममध्ये काम केलं होतं. सिमी ग्रेवाल, अशोक कुमार, मेहमूद अशा कलाकारांसह त्यांनी काम केलं होतं.

हे वाचा - कॅन्सरनंतर अशी झाली संजय दत्तची अवस्था, व्हायरल PHOTO पाहून चाहते हैराण

अभिनयाशिवाय त्यांनी काही फिल्मचं दिग्दर्शन आणि निर्मितीही केली होती. 1978 साली आलेल्या दिल से मिले दिल फिल्मचं दिग्दर्शन आणि निर्मितीही त्यांनी केली होती. या फिल्ममधील गाणीही बप्पी लहरी यांनी संगीतबद्ध केली होती. सा-रे-ग-म-प फिल्ममध्ये विशाल आनंद यांनी कॉमेडिअन भूमिका साकारली.

हे वाचा - "सुशांतची हत्या झाली होती"; AIIMS च्या डॉक्टरांची AUDIO CLIP लीक

विशाल आनंद यांचं निधन म्हणजे भारतीय सिनेसृष्टीला आणखी एक धक्का आहे. 2020 सालात अनेक कलाकारांनी जगाचा निरोप घेतला आहे. अभिनेते ऋषी कपूर आणि इरफान खानचा कॅन्सरमुळे मृत्यू झाला. दिग्दर्शक निशिकांत कामत यांचंही आजारपणामुळे निधन झालं. संगीतदार वाजिद खानचाही किडनीच्या आजारामुळे मृत्यू झाला. गायक एसपी बालासुब्रमण्यम यांचा कोरोनामुळे काही दिवसांपूर्वीच मृत्यू झाला. तर तरुण अभिनेता सुशांत सिंह राजपूतनेदेखील हे जग सोडलं.

Published by: Priya Lad
First published: October 5, 2020, 4:51 PM IST

ताज्या बातम्या