मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'चला हवा येऊ द्या' चे वऱ्हाड निघालं अमेरिकेला ; लवकरच सुरू होणार नवं पर्व

'चला हवा येऊ द्या' चे वऱ्हाड निघालं अमेरिकेला ; लवकरच सुरू होणार नवं पर्व

मराठी प्रेक्षकांना खळखळून हसवून त्यांचे मनोरंजन करणारा ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम घराघरांत लोकप्रिय झाला आहे. आता चला हवा येऊ द्याची टीम परदेश दौरा करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 29 नोव्हेंबर: मराठी प्रेक्षकांना खळखळून हसवून त्यांचे मनोरंजन करणारा आणि सोबतीला मराठी चित्रपट आणि नाटकांना प्रसिद्धचं एक प्रभावी व्यासपिठ उपलब्ध करून देणारा ‘चला हवा येऊ द्या’ (chala hawa yeu dya)  हा कार्यक्रम घराघरांत लोकप्रिय झाला आहे. यातिल प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या मनावर ठसठसून भरलेले आहे. प्रत्येक भागात काही तरी नवीन आणि हास्याचा धमाका उडवून देण्याचं काम करणारी मंडळी म्हणजेच भारत गणेशपुरे, कुशल बद्रिके, विनित बोंडे, श्रेया बुगडे, सागर कारंडे, भाऊ कदम आणि या सर्वांचा सुत्रधार म्हणजेच डॉ. निलेश साबळे या सर्वांच्या विनोदाची चौफेर फटकेबाजी या कार्यक्रमात बघायला मिळते. आता चला हवा येऊ द्याची टीम परदेश दौरा ( america tour ) करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

वाचा : पहिल्या शेवंताच्या तुलनेत नव्या अभिनेत्रीत काय आहे खास? UK मधून शिक्षण आणि...

टीआरपी मराठी या पेजने याबद्दल माहिती दिली आहे. त्यांनी म्हटलं आहे की लवकरच सुरू होत आहे चला हवा येऊद्या चं नवं पर्व! करणार अमेरिका दौरा. त्यामुळे थुकरटवाडी गावातील ही अतरंगी मंडळी परदेश दौरा करण्यास व तिथल्या लोकांना पोट धरून हासवायला सज्ज झाली आहे असं म्हटलं तरी वावगे वाटायला नको.

वाचा : 'आमच्यावेळी हे नव्हतं....'; प्रसाद ओकचा नेमका रोख कुणाकडे?

धम्माल विनोदी स्किट्स, रंगतदार नृत्य आणि सोबतीला अनेक किस्से, आठवणी आणि मजेदार गप्पा असा मनोरंजनाचा भरपूर मसाला असलेल्या या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. आता ही टीम परदेशात देखील हस्याची जादू पसरवण्यास सज्ज झाली आहे. हे पर्व कधी सुरू होणार याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. असं जरी असंल तरी प्रेक्षक मात्र यांचा अमेरिका दौरा पाहण्यासाठी अतुरतेने वाट पाहत आहे.

View this post on Instagram

A post shared by Marathi TRP (@trpmarathi)

यापूर्वी चला हवा येऊ द्या च्या टीमने संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा गेला होता. महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली या शहरात त्यांनी दौरा केला होता. त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता या दौऱ्याला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो आहे हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

First published:

Tags: Entertainment, Marathi entertainment, Zee marathi serial