Home /News /entertainment /

VIDEO: 'Pushpa' चा marathi remake पाहिला का? भाऊ-श्रेयाची chemistry पाहून आवरणार नाही हसू

VIDEO: 'Pushpa' चा marathi remake पाहिला का? भाऊ-श्रेयाची chemistry पाहून आवरणार नाही हसू

Pushpa Marathi remake: नुकतंच 'चला हवा येऊ द्या' चा नवा प्रोमो समोर आला आहे. हा प्रोमो पाहून चाहत्यांची उत्सुकता प्रचंड वाढली आहे. कारण यामध्ये 'चला हवा येऊ द्या'चे कलाकार पुष्पाचा मराठी रिमेक करताना दिसून येत आहेत.

  मुंबई, 29 जानेवारी-  अल्लू अर्जुन (Allu Arjun)  आणि रश्मिका मंदना   (Rashmika Mandanna)  यांच्या 'पुष्पा'  (Pushpa) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. तसेच चित्रपटातील गाणी आणि संवादाने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं आहे. चित्रपटातील गाणी तसेच संवाद सोशल मीडियावर ट्रेंड करत आहेत. जो-तो यावर रील बनवताना दिसत आहे. अशातच 'चला हवा येऊ द्या'  (Chala Hawa Yeu Dya)   च्या सेटवर या चित्रपटाचा रिमेक   (Marathi Remake)  झाला नसता तर नवल. सुपरहिट पुष्पाचा हा मराठी रिमेक तुम्हालाही आवडेल. झी मराठीवर 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रम आपल्या भेटीला येतो. हा कार्यक्रम महाराष्ट्राच्या जनतेचं अफाट मनोरंजन करतो. या कार्यक्रमातील कलाकार आपल्या विनोदी आणि तितक्याच दर्जेदार अभियाने प्रेक्षकांना वेड लावतात. त्यांच्या प्रत्येक स्किटवर प्रेक्षक पोट धरून हसत असतात. इतकंच नव्हे तर कार्यक्रमात येणारे पाहुणे मंडळीसुद्धा हसून लोटपोट होतात.
  नुकतंच 'चला हवा येऊ द्या' चा नवा प्रोमो समोर आला आहे. हा प्रोमो पाहून चाहत्यांची उत्सुकता प्रचंड वाढली आहे. कारण यामध्ये 'चला हवा येऊ द्या'चे कलाकार पुष्पाचा मराठी रिमेक करताना दिसून येत आहेत. आता या कलाकारांनी पुष्पा केला तर तो किती मजेशीर असणार हे वेगळं सांगायला नको. प्रोमो पाहूनच प्रेक्षकांना हसू आवरणं कठीण झालं आहे. (हे वाचा:Taarak Mehta...' फेम बबितावर अटकेची टांगती तलवार, कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला ) समोर आलेल्या प्रोमोमध्ये दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर, बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय असे अनेक कलाकार उपस्थित असलेले दिसून येत आहे. या प्रोमोमध्ये श्रेया बुगडे श्रीवल्ली अर्थातच रश्मिकाच्या भूमिकेत दिसून येत आहे. तर भाऊ कदम हे अल्लु अर्जुनच्या भूमिकेत दिसून येत आहेत. यामध्ये श्रेयाचं नाव श्रेयावल्ली असं ठेवण्यात आलं आहे. श्रेया आपल्या एका मैत्रिणीसोबत या प्रोमोमध्ये एन्ट्री घेते. ती एक गवळण असते. ती आपल्या दुधात पाणी नव्हे तर पाण्यात चुना मिसळून दूध म्हणून विकत असते. हा फारच मजेशीर किस्सा रंगवण्यात आला आहे. उपस्थित पाहुणे हा सर्व स्किट पाहून हसून लोटपोट होत आहेत .चाहते हा एपिसोड पाहण्यासाठी फारच उत्सुक झाले आहेत. स्किटमध्ये भाऊ कदम, कुशल बद्रिके आणि श्रेया बुगडेची मजेशीर केमिस्ट्री पाहून प्रेक्षकांना हसू आवरणं कठीण झालं आहे.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Allu arjun, Chala hawa yeu dya, Marathi cinema, Marathi entertainment

  पुढील बातम्या