Home /News /entertainment /

'चला हवा येऊ द्या'च्या सेटवर अक्षयचा बच्चन पांडे जेव्हा मराठमोळं 'मी तुझा..' गातो; भन्नाट Video पाहून चाहते अवाक

'चला हवा येऊ द्या'च्या सेटवर अक्षयचा बच्चन पांडे जेव्हा मराठमोळं 'मी तुझा..' गातो; भन्नाट Video पाहून चाहते अवाक

बच्चन पांडे चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी अक्षय कुमारने ‘चला हवा येऊ द्या’मध्ये (Chala Hawa Yeu Dya Latest Episode) हजेरी लावली होती. यावेळी अक्षयने चक्क मराठी गाणं गाऊन (Marahi Song) सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.

    मुंबई, 14 मार्च- बॉलिवूड (Bollywood) सुपरस्टार अक्षय कुमारचा (Akshay Kumar) बहुचर्चित 'बच्चन पांडे' हा चित्रपट होळीच्या (Holi) मुहूर्तावर 18 मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. अक्षय कुमार सध्या आपल्या या चित्रपटाच्या प्रसिद्धीत व्यग्र आहे. या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी अक्षयने झी मराठीवरील (Zee Marathi) लोकप्रिय कॉमेडी शो ‘चला हवा येऊ द्या’मध्ये (Chala Hawa Yeu Dya Latest Episode) हजेरी लावली होती. यावेळी अक्षय कुमारसोबत अभिनेत्री क्रिती सेनॉनही (Kriti Sanon) उपस्थित होती. या दोघांनी यावेळी धमाल केली. शिवाय अक्षयनं सर्वांसमोर एक मराठी गाणं (Marathi song) देखील गायलं. त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. चाहते देखील त्याचा मराठी बाणा पाहून अवाक झाले आहेत. झी मराठीनं नुकताच एक प्रोमो शेअर केला आहे. यामध्ये अक्षय कुमारने ‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवर धमाल उडवून दिल्याचं प्रेक्षकांना पाहायला मिळालं. अक्षय कुमारनं त्याच्या ढासू स्टाईलमध्ये क्रितीसोबत डान्स केलाच; पण त्यानं चक्क मराठी गाणं गाऊन (Marahi Song) सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. अक्षय कुमारनं यावेळी 'मी तुझा गं ' हे मराठी गाणं म्हटलं आहे. 'देशील मला साद, येईन मी धावत प्रिया, आलं मरण तर हसत मी झेलीन प्रिया, मी तुझा गं, मी तुझा गं.....' अशा या गाण्याच्या ओळी त्यानं नीलेश साबळेच्या साथीनं गायल्या आहेत यावेळी क्रिती हिनंही ताल धरल्याचं दिसत आहे. प्रेक्षकांनीही अक्षय कुमारच्या या मराठी गाणं गाण्याच्या प्रयत्नाचं कौतुक करत टाळ्या वाजवत त्याला उस्फूर्त दाद दिला. वाचा-'तर मी डिप्रेशनमध्ये गेले असते' आई कुठे...फेम अभिनेत्रीनं सांगितला अनुभव झी मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर ही व्हिडिओ क्लिप शेअर करण्यात आली असून, तिला रसिकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. 16 हजारांपेक्षा अधिक व्ह्यूज या व्हिडिओला मिळाले आहेत.'चला हवा येऊ द्या'च्या विनोदवीरांसोबत अक्षय कुमार खूपच धमाल केली असून, त्याचा हा मराठमोळा अंदाज सर्वांनाच थक्क करणारा आहे.
    बच्चन पांडे चित्रपटाचे कथानक एका गँगस्टरच्या आयुष्यावर आहे आधारित बच्चन पांडे या चित्रपटाचे कथानक एका गँगस्टरच्या आयुष्यावर आधारित असून, या चित्रपटात जॅकलीन फर्नांडिस आणि अर्शद वारसी, पंकज त्रिपाठी आणि प्रतीक बब्बरदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. फरहाद सामजी दिग्दर्शित या चित्रपटात भरपूर अॅक्शन आहे. 'बच्चन पांडे'पूर्वी अक्षयने फरहाद सामजीसोबत 'एंटरटेनमेंट', 'हाऊसफुल 3' आणि 'हाऊसफुल 4' हे चित्रपट केले आहेत. वाचा-9 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी....हृताने सांगितला अभिनय प्रवासाचा अनुभव बच्चन पांडे हा त्यांचा एकत्रित चौथा चित्रपट आहे. 18 फेब्रुवारी 2022 रोजी या चित्रपटाचा पहिला ट्रेलर प्रदर्शित झाला होता. त्यातील अक्षय कुमारचा लूक बघून चाहते खूपच प्रभावित झाले होते, कारण यापूर्वी अक्षय कुमार अशा भूमिकेत कधीही दिसला नव्हता. अक्षय कुमारच्या चाहत्यांमध्ये या चित्रपटाबाबत प्रचंड उत्सुकता असून, ते आतुरतेनं हा चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट पाहत आहेत. या चित्रपटातील 'मार खाएगा' या गाण्यालादेखील चाहत्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला असून, यातील त्याचा स्वॅग अंदाज चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.
    First published:

    Tags: Akshay Kumar, Bollywood News, Entertainment, Marathi entertainment, Zee marathi serial

    पुढील बातम्या