• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • चला हवा येऊ द्या: त्या एका स्किटमुळे निलेश साबळेला धरावे लागले नारायण राणेंचे पाय, काय आहे प्रकरण?

चला हवा येऊ द्या: त्या एका स्किटमुळे निलेश साबळेला धरावे लागले नारायण राणेंचे पाय, काय आहे प्रकरण?

चाला हवा येऊ द्या ( chala hawa yeu dya ) मधील एका स्किटमुळे सूत्रसंचालक निलेश साबळेला (nilesh sable ) नारायण राणेंची माफी मागावी लागली आहे.

 • Share this:
  मुंबई, 24 नोव्हेंबर- झी मराठीवरील सर्वात लोकप्रिय चाला हवा येऊ द्या ( chala  hawa yeu dya )हा शो सध्या सगळीकडे चर्चेत आहे. मात्र यावेळी कारण वेगळे आहे. एका स्किटमुळे शो अडचणीत आला आहे. अनेकदा शोमध्ये विंडबनात्मक स्किट केलं जातं. पण यातील एका स्किटमुळे सूत्रसंचालक निलेश साबळेला (nilesh sable ) नारायण राणेंची माफी मागावी लागली आहे. निलेश साबळे आणि टीमने आज (23 नोव्हेंबर) केंद्रीय मंत्री नारायण राणे  (narayan rane) यांची भेट घेऊन दिलगिरी व्यक्त केली. सध्या सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा रंगली आहे. नारायण राणे आणि निलेश साबळेच्या भेटीचा एक फोटो देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. झी टीव्ही वर नुकत्याच झालेल्या ‘दिवाळी अधिवेशन’ या कार्यक्रमात राणे यांचे हुबेहूब पात्र दाखविण्यात आले होते. यामध्ये राणेंबाबत काही नकारात्मक कंटेट होता. यामुळे राणे समर्थकांनी फोन करुन भावना दुखावल्याचं स्पष्ट केलं. यानंतर निलेश साबळे यांनी राणे यांच्या घरी जाऊन राणेंची माफी मागितली आहे. वाचा : ‘आई कुठे काय करते’ मधील संजनाने रूपाली भोसलेला मिळवून दिला मोठ्या नावाचा पुरस्कार; स्वतः शेअर केली बातमी या पात्रावर राणे समर्थकांनी आक्षेप नोंदविला होता. अनेक कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या होत्या. परिणामी राणे समर्थक आणि कार्यकर्त्यांनी झी टीव्ही आणि साबळेला फोन करून संताप व्यक्त केला होता. त्यामुळे आज साबळे व टीमने राणे यांची भेट घेतली. त्यांनी राणे यांच्या अधिश या निवासस्थानी जात दिलगिरी व्यक्त केली. यावेळी आमदार नितेश राणेदेखील उपस्थित होते.
  नारायण राणे देखील ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाचे चाहते आहेत. त्यांनी कलाकारांचा नेहमी सन्मान केला आहे. अशावेळी एखादी व्यक्तिरेखा साकारताना कुणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. परत अशी चूक होणार नाही. असे निलेश साबळे यांनी यावेळी सांगितले.
  Published by:News18 Trending Desk
  First published: