मुंबई, 7 डिसेंबर- चला हवा येऊ द्या या शोचे अनेक चाहते आहेत त्यामुळे या शोमधील सर्वच कलाकार प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरले आहेत. या शोमध्ये संगीत दिग्दर्शक म्हणून तुषार देवल हा गेले अनेक वर्षे प्रेक्षकांचे संगीताच्या साथीने मनोरंजन करत आहे. सध्या मात्र एका हिंदी अभिनेत्रीच्या चुकीमुळे तुषाराला त्रासाला सामोरे जावं लागत आहे. यासाठी तुषारने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे.
तुषारने इन्स्टावर पोस्ट लिहित म्हटले आहे की, नमस्कार, मी तुषार देवल गेले काही दिवस मला खूप unknown कॉल येत आहेत. त्यामुळे मी प्रचंड त्रस्त आहे. ह्या सगळ्याचं कारण आहे हिंदी मालिकेतील अभिनेत्री ख्याती जोशी उर्फ गुलकी जोशी हिने तिच्या युट्युब इंटरव्ह्यूमध्ये तिचं CINTAA चं कार्ड दाखवलं. ज्यात माझा मोबाईल नंबर दाखवला गेला आहे. त्यामुळे मी गुलकी जोशी समजून मला दिवसाला जवळ जवळ 100 च्या वर कॉल येत आहेत. ही सर्व माहिती मी त्या अभिनेत्रीपर्यंत माझ्या एका मित्राच्या माध्यमातून पोहोचवली.
त्यावर तिने त्या युट्युब चॅनल मधील माझा नंबर ब्लर देखील केला. पण तो पर्यंत तो व्हिडिओ 6 हजार लोकांनी पाहिला होता. त्यामुळे मला अजूनही कॉल येत आहेत. बर ह्या सगळ्या प्रकारानंतर मॅडमनी (गुलकी जोशी) मला सॉरी म्हणायला तरी कॉल करायला पाहिजे होता तो अद्याप आलेला नाही. तरी या प्रकरणातून मार्ग कसा काढता येईल. अशा स्वरूपाची एक पोस्ट तुषारने शेअर केली आहे.
View this post on Instagram
गुलकी जोशी हिंदी मालिकेतील एक आघाडीची नायिका म्हणूनही ओळखली जाते. मॅडम सर या मालिकेत ती मुख्य भूमिका साकारत आहे. गुलकी जोशीने वागळे की दुनिया, तेरा यार हुं मै, जिद्दी दिल माने ना यासारख्या हिंदी मालेकत प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. मात्र तिच्या चुकीची शिक्षा तुषारला मिळत आहे. आता यावर अभिनेत्री प्रतिक्रिया देणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Marathi entertainment, Tv serial, Zee marathi serial