08 नोव्हेंबर : कसे आहात मंडळी, हसताय ना, हसायलाच पाहिजे, असं म्हणत गेली तीन वर्षे संपूर्ण महाराष्ट्राला हसवणारा चला हवा येऊ द्या या शोने प्रेक्षकांची रजा घेतलीय. मंगळवारी या शोचा शेवटचा एपिसोड प्रसारित झाला. त्यामुळे थुकरटवाडी गावातील भाऊ कदम, कुशल बद्रिके, सागर कारंडे, श्रेया बुगडे, निलेश साबळे ही अतरंगी मंडळी सोमवार आणि मंगळवार रात्री 9.30 च्या ठोक्याला आपल्याला भेटणार नाहीत.
मंगळवारच्या भागात कार्यक्रमाचा सूत्रसंचालक डॉ. निलेश साबळेने स्वतःच आता थोडंसं थांबण्याची वेळ आल्याचे सांगितले. या कार्यक्रमाच्या जागी 'हम तो तेरे आशिक है' ही नवी मालिका आपल्याला पहायला मिळेल.
'चला हवा येऊ द्या'नं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. या शोचे दौरे राज्यात आणि परदेशातही झालेत. त्यामुळे प्रेक्षकांना या शोचा पुन्हा एकदा इंतजार आहेच.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा