28 आॅक्टोबर : 'चला हवा येऊ द्या' हा कार्यक्रमाची लोकप्रियता आता अगदी देशा-परदेशात पोहोचलीये. आधी महाराष्ट्र आणि त्यानंतर भारत दौरा केल्यानंतर आता या शोची टीम देशाबाहेर हा शो घेऊन जाणारे. 'चला हवा येऊ द्या'ची टीम लवकरच लंडनला रवाना होणारे.
येत्या 12 नोव्हेंबरला ही टीम लंडनच्या ट्रॉक्सी थिएटरमध्ये खास एपिसोड शूट करणारे. डॉ. निलेश साबळे, श्रेया बुगडे, कुशल बद्रिके, सागर कारंडे, भाऊ कदम आणि भारत गणेशपुरे हे या शोसाठी लवकरच लंडनला रवाना होणारेत.
याआधी आॅस्ट्रेलियाला या टीमचा दौरा झाला होता. तिथल्या भारतीयांमध्ये या कलाकारांनी खूप धमाल केली होती.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा