झी मराठीवर नुकताच 'मन झालं बाजिंद' (Man Zal Bajind) ही मालिका आपल्या भेटीला आली आहे. मालिकेची कथा सुंदर अशा ग्रामीण भागात घडणारी आहे. या मालिकेने अल्पवधीतच रसिक प्रेक्षकांच्या मनात आपलं घर केलं आहे. विशेष म्हणजे सुप्रसिद्ध 'सैराट'चित्रपटातील गाजलेली पात्र सल्या आणि बाळ्या अर्थातच अरबाज आणि तानाजी यांनी या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं आहे. हे दोघेही पुन्हा एकदा चाहत्यांचं प्रेम मिळवण्यात यशस्वी होत आहेत. या मालिकेची टीम नुकताच चला हवा येऊ द्याच्या सेटवर आली होती. यावेळी मालिकेतील कलाकरांसोबत चला हवा येऊ द्याच्या टीमने मोठी मजामस्ती केली आहे. (हे वाचा:Bigg Boss15: नॉमिनेशन टास्क दरम्यान सुरेखा ताई झाल्या नाराज! समजूत काढण्यासाठी..) नुकताच 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमाचा नवा प्रोमो समोर आला आहे. यामध्ये श्रेया बुगडे 'मन झालं बाजिंद'मालिकेतील मुंज्या अर्थातच तानाजीसोबत धम्माल करताना दिसत आहे. या दोघांना कॉमेडी करताना पाहून सेटवरील इतर कलाकार हसून लोटपोट झाले आहेत. या नव्या प्रोमोमध्ये तानाजी आणि श्रेया सैराट या गाजलेल्या चित्रपटाच्या सैराट झालं जी या गाण्यावर रोमँटिक डान्स करत आहेत. मुंज्या तिला पटवण्यासाठी अनेक खटाटोप करत आहे. मात्र श्रेया काय त्याला पटत नसते. नंतर श्रेया शक्कल लढवून मुंज्याला डोळे बंद करायला सांगते. आणि त्याच्या नकळत त्याला चक्क राखी बांधून टाकते. असा हा मजेशीर प्रोमो आहे. या दोघांची ही भन्नाट कॉमेडी पाहून इतर कलाकार पोट धरून हसत आहेत. (हे वाचा:बेपनाह प्यार है आ जा...'लडाखमध्ये अक्षया कोणाला घालतेय साद?पाहा VIDEO ) 'मन झालं बाजिंद' मालिकेतून तानाजी पुन्हा एकदा चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. चाहते त्याला भरभरून प्रेम देत आहेत. तिच्या सरळ-साध्या अभिनयाला पसंती देत आहेत. सैराट चित्रपटाने या कलाकारांचं आयुष्य बदलून टाकलं आहे. या चित्रपटाने त्यांना एका रात्रीत स्टार बनवलं आहे. या चित्रपटामुळे रिंकू,आकाश आणि अरबाजसोबतच तानाजीलाही प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. तर दुसरीकडे श्रेयाबद्दल बोलायचं झालं तर तिने आपल्या अचूक कॉमेडी टायमिंगने अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावलं आहे. तिचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. हे दोन्ही लोकप्रिय कलाकार एकत्र आल्यावर धम्माल तर होणारच हे नक्की.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.