VIDEO: पोस्टमन काकांचं पत्र आणि रोहित पवारांच्या डोळ्यात आलं पाणी, पाहा नेमकं काय घडलं

VIDEO: पोस्टमन काकांचं पत्र आणि रोहित पवारांच्या डोळ्यात आलं पाणी, पाहा नेमकं काय घडलं

चला हवा येऊ द्या (Chala Hava Yeu Dya) मध्ये सहभागी झालेल्या रोहित पवार (Rohit Pawar) यांचे डोळे पोस्टमन काकांचं पत्र ऐकून पाणावले.

  • Share this:

मुंबई, 12 डिसेंबर: काय मंडळी हसताय ना हसयलाच पाहिजे. असं म्हणत गेली 6 वर्ष अवघ्या महाराष्ट्राचं मनोरंजन करणाऱ्या चला हवा येऊ द्या (Chala Hava Yeu Dya) या कार्यक्रमाचा येणाऱ्या आठवड्यातला भाग अतिशय स्पेशल असणार आहे. एरवी या कार्यक्रमात मनोरंजन क्षेत्रातील विविध मंडळी हजेरी लावतात. इतर काही क्षेत्रातील मंडळीही या मंचावर येऊन गेली आहेत. मात्र लवकरच प्रदर्शित होणाऱ्या एका एपिसोडमध्ये राजकीय हास्याचे कारंजे उडणार आहेत. महाराष्ट्रातील तरुण-तडफदार नेतेमंडळी या कार्यक्रमात आपल्याला दिसणार आहेत. भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde), भाजप खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) शरद पवार यांचे नातू आणि NCP चे युवा आमदार रोहित पवार (Rohit Pawar)- महाराष्ट्रारातील हे युवा चेहरे CHYD च्या मंचावर दिसणार आहेत.

चला हवा येऊ द्या कार्यक्रमात ‘पोस्टमन काका सागर कारंडे’ यांनी ऊसतोड कामगारांच्या समस्या आणि त्यांचा दुःख सांगणारं पत्र सादर केलं, आणि ते पत्र ऐकताना रोहित पवारांच्या डोळ्यात पाणी आलं.  रोहित पवार हे राज्यातलं युवा नेतृत्व आहे. लहानपणापासूनच त्यांनी राजकारण जवळून बघितलं आहे. आता या कार्यक्रमात ऊसतोड कामगारांच्या व्यथा ऐकल्यानंतर त्यांना गहिवरुन आलं होतं. चला हवा येऊ द्या हा सर्वांचच मनोरंजन करणारा कार्यक्रम आहे पण पोस्टमन काकांच्या पत्राचा सेगमेंट सगळ्यांना भावुक करुन जातो. पत्राच्या माध्यमातून विविध विषयांना हात घातला जातो.

सुजय विखे पाटील यांनी कमळ हाती घेतल्यानंतर अशाप्रकारे राजकीय नसणाऱ्या कार्यक्रमात रोहित पवार यांच्याबरोबर व्यासपीठ शेअर करताना या दोन्ही नेत्यांच्या काय प्रतिक्रिया असतील हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.दरम्यान पंकजा मुंडे यांनी देखील या कार्यक्रमात पती अमित पालवे यांच्याबरोबर उपस्थिती दर्शवली आहे. सुजय विखे पाटील देखील त्यांची पत्नी धनश्री विखे यांच्याबरोबर उपस्थित होते.

Published by: Amruta Abhyankar
First published: December 12, 2020, 5:16 PM IST

ताज्या बातम्या