मुंबई, 31 डिसेंबर- महाराष्ट्राला खळखळून हसवण्याचा वसा घेतलेला कार्यक्रम म्हणजे 'चला हवा येऊ द्या' (Chala Hava Yeu Dya) होय. या कार्यक्रमामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं टेन्शन नाहीसं होतं. या कार्यक्रमातील कलाकारांनी रसिक प्रेक्षकांच्या मनात आपलं विशेष स्थान निर्माण केलं आहे. यातीलच एक कलाकार म्हणजे अभिनेता कुशल बद्रिके (Kushal Badrike) होय. त्याच्या कॉमेडी टायमिंग आणि हटके स्टाईलने त्याने सर्वांचं मन जिंकलं आहे. या अभिनेत्याबद्दल जाणून घ्यायला चाहत्यांना नेहमीच आवडत. त्यामुळेच आज आपण त्याच्या आयुष्यातील लेडी बॉस अर्थातच तिच्या पत्नीबद्दल (Kushal Badrike s Wife) जाणून घेणार आहोत.
कुशल बद्रिके एक अवलिया माणूस म्हणून ओळखला जातो. 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमातून त्याचं हरहुन्नरी अभिनय सर्वांनीच पाहिलं आहे. या कार्यक्रमातून त्याने असंख्य भूमिका साकारून प्रेक्षकांना खळखळून हसवलं आहे. लोकांना त्याचा अभिनय आणि विनोदावरची त्याची पकड फारच आवडते. त्याच्या प्रत्येक पंचला प्रेक्षक हसून लोटपोट होतात. त्यामुळेच त्याला महाराष्ट्रातून अफाट प्रेम मिळत आहे.अल्पावधीतच कुशलने प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. आज महाराष्ट्रातील घराघरात त्याला ओळखलं जातं. तसेच त्याच्या चाहत्यांना त्याच्या कुटुंबाबद्दल, त्याच्या खाजगी आयुष्याबद्दल जाणून घ्यायला आवडत. अनेकांना या अवलिया माणसाच्या अर्धांगिनी अर्थातच पत्नीबद्दल जाणून घ्यायचं असतं.
View this post on Instagram
कुशल बद्रिके हा जितका उत्कृष्ट अभिनेता आहे, तितकाच उत्तम माणूससुद्धा आहे. त्याच्या अनेक सहकलाकारांनीं त्याच्याबद्दल ही गोष्ट मान्य केली आहे. मात्र फारच कमी लोकांना माहिती आहे कि तो एक उत्तम पतीसुद्धा आहे. तो आपल्या पत्नीवर फारच प्रेम करतो. कुशल सतत कार्यक्रमातूनही आपल्या पत्नीचं कौतुक करत असतो. त्याच्या पत्नीचं नाव सुनैना बद्रिके असं आहे. सुनैना दिसायला कोणत्याही अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. सुनैना एक डान्सर आहे. तिला कथ्थकची प्रचंड आवड आहे. ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. ती सतत आपल्या डान्सचे एकापेक्षा एक व्हिडीओ शेअर करत असते. सुनैना स्वतःचा डान्स क्लासदेखील चालवते. ती आत्मनिर्भर स्त्री आहे. तसेच कुशल बद्रिकेनं अनेकवेळा आपल्या कार्यक्रमात मजे-मजेत आपल्या पत्नीच्या डान्स क्लासची जाहिरात केली आहे.
View this post on Instagram
कुशल बद्रिके सोशल मीडियावर प्रचंड ऍक्टिव्ह असतो. तो सतत आपल्या पोस्टच्या माध्यमातूनही चाहत्यांशी जोडलेला असतो. तो सतत सोशल मीडियावर आपल्या खाजगी आयुष्यातील फोटोही शेअर करत असतो. अनेकवेळा त्याने आपल्या पत्नी आणि मुलासोबतचे फोटो शेअर केले आहेत. चाहते त्याच्या प्रत्येक पोस्टला भरभरून लाईक्स आणि कमेंट्स करतात. कुशल बद्रिके चाहत्यांचं मनोरंजन करण्याची एकही संधी नाही सोडत. कुशल बद्रिके आपल्या पत्नीसोबत 'होम मिनिस्टर' कार्यक्रमातही सहभागी झाला होता. यावेळी त्याने आपल्या वैवाहिक आयुष्याबाबत अनेक दिलखुलास गप्पा मारल्या होत्या.
(हे वाचा:शंकर महादेवन यांच्या समोर तरुणाने गायिलं दादा कोंडकेंचं गाणं! जबरदस्त VIDEO )
कुशल बद्रिकेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तो, 'चला हवा येऊ द्या' या विनोदी कार्यक्रमाचा एक अविभाज्य भाग आहे. शिवाय तो अनेक चित्रपटांमध्येही झळकत आहे. नुकताच तो त्याचा सहकलाकार आणि महाराष्ट्राचा लाडका अभिनेता भाऊ कदमसोबत 'पांडू' या चित्रपटात दिसला होता. हा एक विनोदी चित्रपट आहे. त्याला महाराष्ट्रातून भरभरून प्रेम मिळालं आहे. यामध्ये सोनाली कुलकर्णीची सुद्धा महत्वाची भूमिका होती. सोनालीच्या 'केळीवाली..' या गाण्याने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.