Home /News /entertainment /

'हे माझं स्वप्न होतं पण घरच्या जबाबदारीत मागे पडत राहीलं', कुशल बद्रिकेची पत्नीसाठी भावुक पोस्ट

'हे माझं स्वप्न होतं पण घरच्या जबाबदारीत मागे पडत राहीलं', कुशल बद्रिकेची पत्नीसाठी भावुक पोस्ट

कुशलने नुकतीच त्याच्या बायकोसाठी ( sunayana badrik ) एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. सध्या त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

  मुंबई, 14 मार्च- चला हवा येऊ द्या फेम कुशल बद्रिके ( kushal badrike ) सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतो. कधी फॅमेलीसोबत तर कधी चला हवा येऊ द्याच्या सेटवरील भन्नाट व्हिड़िओ तो चाहत्यांसोबत शेअर करत असतो. कुशलने नुकतीच त्याच्या बायकोसाठी ( sunayana badrik ) एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. सध्या त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. कुशनलं पत्नी सुनैनाचा कथ्थक करतानाचा फोटो शेअर करत म्हटलं आहे की, खरंतर तू दिल्लीला जाऊन “कथक केंद्रात” शिकावस, हे माझं स्वप्न होतं. पण घरच्या जबाबदारीत ते मागे पडत राहीलं…… ते राहीलच! पण बघ ना आज तू तिथे परफॉर्म करतेस “ Really really proud of you”आयुष्यातली सगळीच स्वप्न आकार घेत नाहीत, पण त्यातली काही साकार होतात हे खर.ही संधी तुला देणार्‍यांचे मनःपूर्वक आभार.आणि एकच गोष्ट सांगेन,जा… सिमरन, जा जी ले अपनी जिंदगी…..
  कुशलच्या पत्नीचं नाव सुनैना बद्रिके असं असून ती उत्तम नृत्यांगना आहे. सुनैना कथ्थक नृत्यांगना असून सोशल मीडियावर ती अनेकदा तिचे डान्स व्हिडिओ शेअर करत असते. तिचे डान्स क्लास आहेत. वाचा-भरत जाधव यांनी शेअर केलेल्या 30 वर्षापूर्वीच्या फोटोत लपलेत तीन कलाकार कुशल बद्रिके अलिकडेच 'पांडू' या चित्रपटात झळकला होता. या चित्रपटात त्याने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. पांडू सिनेमातील त्याच्या अभिनयाचे कौतुक झाले. भाऊ कदम आणि कुशल बद्रिकेच्या जोडीने प्रेक्षकांचे मन जिंकले. वाचा-'तर मी डिप्रेशनमध्ये गेले असते' आई कुठे...फेम अभिनेत्रीनं सांगितला अनुभव कुशल नुकताच किचन कल्लाकार या शोमध्ये दिसला होता. यावेळी त्याने सांगितले होते की, माझे जेवढे सिक्रेट बायकोला माहित नाहीत तेवढे श्रेया बुगडेला माहिती आहेत.  श्रेया बुगडे आणि कुशल चांगले मित्र आहेत. सोशल मीडियावर देखील कुशल श्रेयासोबतचे काही मजेशीर व्हिडिओ शेअर करताना दिसतो.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment, Zee marathi serial

  पुढील बातम्या