'व्हेनिस फिल्म फेस्टिव्हल'मध्ये मराठीचा झेंडा, दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणेंच्या चित्रपटाने मारली बाजी

'व्हेनिस फिल्म फेस्टिव्हल'मध्ये मराठीचा झेंडा, दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणेंच्या चित्रपटाने मारली बाजी

व्हेनिस हा जगातल्या तीन महत्त्वाच्या चित्रपट महोत्सवांपैकी एक आहे. तिथे प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांची जगभर चर्चा होते.

  • Share this:

मुंबई 14 सप्टेंबर: जगात मानाचा समजल्या जाणाऱ्या 'व्हेनिस फिल्म फेस्टिव्हल'मध्ये मराठी चित्रपटाचा झेंडा फडकला आहे. दिग्दर्शक चैनन्य ताम्हाणेंच्या ‘द डिसायपल' असे या मराठी चित्रपटाला दोन महत्त्वाचे पुरस्कार मिळाले आहेत. 'इंटरनॅशनल क्रिटिक्स' तसेच उत्कृष्ट पटकथा लेखनाचा पुरस्कारही मिळाला आहे. हा पुरस्कार मिळवणारा ‘द डिसायपल' हा गेल्या 30 वर्षातला पहिलाच चित्रपट आहे.

चैतन्य ताम्हाणे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘कोर्ट’ या चित्रपटाची भारताकडून ऑस्करसाठी निवड झाली होती. भारतातल्या अनेक चित्रपट महोत्सवातही हा चित्रपट गाजला होता.

‘द डिसायपल'मुळे तब्बल 19 वर्षांनी भारतीय चित्रपटाचं नाव व्हेनिसमध्ये पुरस्कारासाठी घेतलं गेलं आहे. या आधी मीरा नायर यांच्या ‘मॉन्सून वेडिंग’ या चित्रपटाला ‘गोल्डन लायन’ हा मानाचा पुरस्कार मिळाला होता.

व्हेनिस हा जगातल्या तीन महत्त्वाच्या चित्रपट महोत्सवांपैकी एक आहे. तिथे प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांची जगभर चर्चा होते. शास्त्रीय संगीत आणि त्याचं जग यावर हा चित्रपट आधारीत आहेत. यात सुमित्रा भावे, आदित्य मोडक, सुमित द्रविड आणि किरण यज्ञोपवीत यांच्या भूमिका आहेत.जगभरातून चैतन्य ताम्हाणेंचं आणि त्याच्या चित्रपटाचं कौतुक होत आहे.

या चित्रपटामुळे मराठी चित्रपटांची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. अशा चित्रपटांमुळे चाकोरी मोडायला मदत होते. नवे प्रवाह येतात आणि दिशा बदलते असं मत व्यक्त होत आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: September 14, 2020, 6:32 PM IST
Tags:

ताज्या बातम्या