सेन्सॉर बोर्डाने दाखवला इंदु सरकारला हिरवा कंदिल

सेन्सॉर बोर्डाने दाखवला इंदु सरकारला हिरवा कंदिल

इंदिरा गांधी आणि संजय गांधींना चुकीच्या पद्धतीने दाखवल्याचे आरोप या सिनेमावर करण्यात येत आहे.

  • Share this:

26 जुलै: गेल्या काही दिवसात वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या इंदु सरकारच्या प्रदर्शनाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. सेन्सॉर बोर्डाने इंदु सरकारला मान्यता दिली असून हा सिनेमा 28 जुलैला थिएटरमध्ये झळकेल.

इंदु सरकार हा सिनेमा 1975-77 काळातल्या आणिबाणीवर आधारित आहे. इंदिरा गांधी आणि संजय गांधींना चुकीच्या पद्धतीने दाखवल्याचे आरोप या सिनेमावर करण्यात येत आहे. सेन्सॉर बोर्डाने या सिनेमास मान्यता दिली असली तरी मान्यता देताना सिनेमातले तब्बल 14 सीन सेन्सॉर बोर्डाने कट केले आहेत. चित्रपटातील आर.एस.एस, अकाली हे शब्दही सेन्सॉर बोर्डाने काढून टाकले आहे.

मधुर भांडारकरने दिग्दर्शीत केलेल्या या सिनेमात नील नितीन मुकेश, कीर्ती कुल्हारी, तोता राय चौधरी प्रमुख भूमिकेत आहेत.

First published: July 26, 2017, 11:10 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading