बॉलिवूडमध्ये येण्याआधी 'गे' व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये होती 'ही' अभिनेत्री

बॉलिवूडमध्ये येण्याआधी 'गे' व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये होती 'ही' अभिनेत्री

काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत या अभिनेत्रीनं तिच्या आयुष्यातील एका अशा गोष्टीचा खुलासा केला ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसला.

  • Share this:

मुंबई, 18 जानेवारी : बॉलिवूड अभिनेत्री सेलिना जेटलीनं 2003 मध्ये ‘जानशीन’ या सिनेमातून बॉलिवूड पदार्पण केलं होतं. या सिनेमात तिनं अभिनेता फरदीन थखानसोबत स्क्रिन शेअर केली. तिचा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल करू शकला नव्हता मात्र यातील गाणी मात्र प्रेक्षकांच्या पसंतीत उतरली. सेलिना बॉलिवूडमध्ये काही खास जागा बनवू शकली नाही. पुढे तिनं एका विदेशी बिझनेसमन सोबत लग्न करुन संसार थाटला. काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत सेलिनानं तिच्या आयुष्यातील एका अशा गोष्टीचा खुलासा केला ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसला.

सेलिना लवकरच 'अ ट्रिब्यूट टू रितुपर्णो घोष: सीजन्स ग्रीटिंग्स' या सिनेमातून कमबॅक करत आहे. जवळपास 7 वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये परतणाऱ्या सेलिनानं काही दिवसांपूर्वी या सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलं. यानंतर दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या खासगी आयुष्याविषयी एक धक्कादायक खुलासा केला. सेलिनानं टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं, कोलकातामध्ये एका गे मेकअप आर्टिस्ट माझी माझ्या आईसारखी काळजी घेत असे. त्यावेळी मी मॉडेल म्हणून स्ट्रगल करत होते. त्यावेळी मी एका गे व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये होते. तो वयानं बराच मोठा होता आणि मी अवघ्या 16 वर्षांची होते. त्यावेळी काही लोकांच्या अचानक मृत्यूनं माझं आयुष्य बदललं.

नेहा-आदित्यचं लग्न झाल्यास उदित नारायण यांना होणार फायदा?

 

View this post on Instagram

 

In German we say “spazieren gehen” (to go for a walk, to take a stroll). Being back home in the Austrian Alps reminds me so much of growing up in the Kumaon Hills, I do the same things my mother did with me, she had two and I have 3, If we don’t care for our planet this will not be possible anymore. Climate change is real and our children’s children may never have the opportunity to still do this in snow patched mountains in summer if we don’t take action now. #stopclimatechange #globalwarming #mountains #austrian #indian #indoaustrian #indoaustrian #c #celina #celinajaitley #beautyqueen #beautyqueens4ever #indianwomen #initiative #celinajaitly #travelgram #travel #kumaonhills #kumaon #austrianalps

A post shared by Celina Jaitly (@celinajaitlyofficial) on

सेलिना पुढे म्हणाली, त्यावेळी मला एक गोष्ट समजली की सर्वांना हा हक्क आहे की त्यांना कोणासोबत राहायचं आहे. त्यावेळी मला समजलं की मला काहीतरी करायला हवं. मी अनेक वर्षं LGBT अ‍ॅक्टिव्हीस्ट होते. यूएनने या कामासाठी गुडविल अँबेसिडर म्हणूनही निवडलं होतं. सेलिना जेटलीनं 2001 मध्ये मिस इंडियाचा किताब जिंकून त्यानंतर बॉलिवूडमध्ये पाऊल टाकलं.

मलायका आणि मॉडेलमध्ये कॅटफाइट, अरबाज खान आहे कारण?

 

View this post on Instagram

 

This year Christmas was not easy... having lost my parents and our son Shamsher, it was very difficult to see joy in this magical time of the year. However every time we look at @arthurjhaag we are so grateful that our arms were not left bare, and @winstonjhaag @viraajjhaag continue to make us smile, my heart is soaked with sorrow for having lost my beloved ma n pa but I have so much gratitude for what they taught me and what I am today because of them, @haag.peter and I would like to take the opportunity to thank all of our followers, for the continued support and love through these difficult times, We are beyond lucky to have you all in our life. You all are an amazing reminder that the universe is on our side. Thank you for being there for me/us yet again. Pray for us and bless us... we wish you a joyous new year and a Merry Christmas.. #christmas #gratitude #positiveaffirmations #myuae #instakids #dubaikids #family #followers #jaitlyhaag #arthur #arthurjhaag #peter #peterhaag #bollywood #austrian #indian #dubai #c #celina #celinajaitly #celinajaitley #thankyou

A post shared by Celina Jaitly (@celinajaitlyofficial) on

सेलिनानं बॉलिवूडच्या काही सिनेमांमध्ये काम केलं मात्र तिला फारशी कमाल करता आली नाही. 2011 मध्ये तिनं बिझनेसमन पीटर हागशी लग्न केलं. त्यानंतर ती बॉलिवूडपासून दूर झाली. सेलिना चार मुलांची आई आहे. 2012 मध्ये तिनं जुळ्या मुलांना जन्म दिला. ज्यांची नावं विराज आणि विस्टन अशी आहेत. त्यानंतर 2017 मध्ये ती पुन्हा आई झाली त्यावेळीही तिनं जुळ्या मुलांना जन्म दिला.

बाप-लेकीत कोण बेस्ट? 10 वर्षांनंतरच्या Love Aaj Kal वर सैफची ‘ही’ प्रतिक्रिया

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: Bollywood
First Published: Jan 18, 2020 04:28 PM IST

ताज्या बातम्या