PHOTOS : कृष्णा राज कपूर यांना अलविदा करायला लोटलं बाॅलिवूड

कृष्णा राज कपूर यांचं वयाच्या 87व्या वर्षी निधन झालं. बाॅलिवूडच्या अनेक घटनांच्या त्या साक्षीदार. त्यांना अंतिम निरोप द्यायला आणि कपूर कुटुंबाचं सांत्वन करायला बाॅलिवूड लोटलंय

  • Share this:

कृष्णा कपूर यांच्या निधनानं कपूर कुटुंबावर मोठं दु:ख कोसळलंय. त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी अख्खं बाॅलिवूड त्यांच्या घरी लोटलंय. कृष्णा नातवंडांच्या लाडक्या आजी होत्या. अभिनेत्री करिष्मा कपूरही आजीच्या अंत्यदर्शनाला पोचली.

खरं तर नातवंडं आणि कृष्णा आजी यांचे खास बंध होते. तिथे उपस्थित असलेल्या करिनाला किती वाईट वाटलंय, हे तिच्या चेहऱ्यावरून दिसत होते.

कृष्णा कपूर यांनी कुटुंबाला जसं जोडलं होतं ,तसं बाॅलिवूडच्या अनेक कलाकारांनाही जीव लावला होता. अभिनेत्री काजोलही तिथे पोचली.

अभिनेता संजीव कपूरही शेवटच्या दर्शनासाठी तिथे पोचले. कृष्णा कपूर गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांची तब्येत अधिक खालावली.

अभिनेते राजीव कपूर आईच्या अंत्यदर्शनाला पोचला. कृष्णा यांच्या पश्चात रणधीर, ऋषी, राजीव, रीमा आणि रितू ही पाच मुलं आहेत. पण आता एक मोठा प्रश्न निर्माण झालाय. आपल्या आईच्या अंत्यसंस्काराला ऋषी कपूर पोचू शकतील की नाही? कारण ते अमेरिकेत आहेत.

बाॅलिवूडमध्ये शहेनशहा अमिताभ बच्चन यांचे सगळ्यांशीच चांगले संबंध आहेत. कृष्णा कपूर यांच्या निधनाची बातमी कळताच ते लगोलग तिथे पोचले. कपूर कुटुंबाशी बिग बींचे ऋणानुबंध मोठे आहेत.

राणी मुखर्जीही कृष्णा यांचं अंत्यदर्शन घ्यायला पोचली. 87 वर्षांच्या कृष्णा बाॅलिवूडच्या अनेक घटनांच्या साक्षीदार होत्या. त्यांच्या जाण्यानं एक पर्व संपलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 1, 2018 06:23 PM IST

ताज्या बातम्या