एके काळी बॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री आता दिसते अशी

एके काळी बॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री आता दिसते अशी

या फोटोत दिसणारी महिला ओळखीची वाटतेय का? एकेकाळी बॉलिवूड गाजवणारी, नंबर वनची अभिनेत्री ठरू पाहणारी ही सेलेब्रिटी म्हणतेय दीपिका, कतरिना, शिल्पा, सुश्मिता आणि भाग्यश्री यांच्यासारख्या फिट नट्यांचं मला कौतुक वाटतं.

  • Share this:

मुंबई, 13 जानेवारी : सोशल मीडियावर सेलेब्रिटींचे फिटनेस व्हिडिओ नेहमी शेअर होत असतात. जिममध्ये घाम गाळणाऱ्या सेलेब्रिटी अनेकांसाठी प्रेरणा ठरतात. पण या फोटोत दिसणारी महिला ओळखीची वाटतेय का? एकेकाळी बॉलिवूड गाजवणारी, नंबर वनची अभिनेत्री ठरू पाहणारी ही सेलेब्रिटी म्हणतेय दीपिका, कतरिना, शिल्पा, सुश्मिता आणि भाग्यश्री यांच्यासारख्या फिट नट्यांचं मला कौतुक वाटतं.

90 च्या दशकात बॉलिवूड गाजवणारी ही अभिनेत्री आहे. हिरो, जुर्म, दामिनी अशा चित्रपटांमधून ठसा उमटवणारी मीनाक्षी शेषाद्रीचा हा फोटो तिने स्वतःच शेअर केला आहे. 1996 मध्ये चित्रपटातून संन्यास घेऊन ती नवऱ्याबरोबर अमेरिकेत स्थायिक झाली. मीनाक्षीला दोन मुलं आहेत. अमेरिकेत भरतनाट्यमचं प्रशिक्षण ती देते.

मीनाक्षी शेषाद्रीने अनेक हिंदी आणि तमीळ, तेलुगू चित्रपट केले आहेत. 1981 मध्ये  मिस इंडियाचा किताब तिला मिळाला होता. त्या वेळी ती 17 वर्षांची होती. हरीश मायसोर या इन्व्हेस्टर बँकरशी लग्न करून ती अमेरिकेत गेली. 56 वर्षांची मीनाक्षी सोशल मीडियावर सक्रिय आहे. मध्यंतरी तिने ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठीच्या रांगेत उभी असतानाचा व्हिडिओ तिने शेअर केला होता.

ती या रांगेत तब्बल 8 तास थांबली. एवढा वेळ रांगेत थांबून आपल्याला कुणी ओळखलं नाही, असंही तिने ट्वीटमध्ये लिहिलं होतं.

या दोन्ही फोटोंमध्ये मीनाक्षी अगदी वेगळी दिसते आहे.

----------------------

अन्य बातम्या

अनुष्का शर्मा करतेय क्रिकेटमध्ये पदार्पण? ब्लू जर्सीत सराव करतानाचे PHOTO VIRAL

सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय हा क्यूट PHOTO; ओळखता येतेय का चिमुरडी?

ऐश्वर्या राय माझी आई, 32 वर्षीय तरुणाने केला दावा

First Published: Jan 13, 2020 09:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading