Home /News /entertainment /

WOW With Sonali मध्ये ललित प्रभाकरचे खरे बोल ; म्हणतो, मला सई ताम्हणकरसोबत डेटला जायला आवडेल

WOW With Sonali मध्ये ललित प्रभाकरचे खरे बोल ; म्हणतो, मला सई ताम्हणकरसोबत डेटला जायला आवडेल

सोनाली खरेचा खरे बोल (Khare Bol) सोनालीचा सीजन 2 देखील पहिल्या सीजन इतकाच सध्या सगळीकजे गाजत आहेत. तिच्या या दुसऱ्या सीजनचा पहिला वहिला गेस्ट फिटनेस फ्रिक मराठमोळा अभिनेता ललित प्रभाकर हा आहे.

    मुंबई, 13 ऑक्टोबर :  मराठमोळी अभिनेत्री सोनाली खरे (Sonali Khare) तिच्या फिटनेस साठी ओळखली जाते. ती योगा स्टाईल खूप परफेक्ट रित्या करते. सोनाली खरे सोशल मीडियावर नेहमी अॅक्टीव असते. ती तिचे काही फिटनेससंबंधी काही व्हिडिओ किंवा फोटो तसेच त्यासंबंधी माहिती चाहत्यांसोबत शेअर करत असते. यासोबतचा सोनाली खरेचा खरे बोल (Khare Bol) सोनालीचा सीजन 2 देखील पहिल्या सीजन इतकाच (world wellness With Sonali )सध्या सगळीकजे गाजत आहेत. प्रेक्षाकांची याला चांगली पोचपावती मिळत आहे. या सीजनमध्ये सोनली फिटनेसवर अनेक मराठी कलाकारांसोबत गप्पा मारताना तसेच त्यांच्या फिटनेस फ्रिक राहण्याचे रहस्य काय अशा गोष्टींवर गप्पा मारताना दिसत आहे. तिचा हा कार्यक्रम फक्त आणि फक्त WOW With Sonali या तिच्या यूट्यूब चॅनेलवर पाहता येतो. तिच्या या दुसऱ्या सीजनचा पहिला वहिला गेस्ट कोण असेल सर्व मुलीवर्गाचा लाडका फिटनेस फ्रिक मराठमोळा अभिनेता ललित प्रभाकर (Lalit Prabhakar) हा आहे. मी आतापर्यंत कधी डायट असं काही केले नाही खऱे बोलमध्ये ललित प्रभाकरने सोनालीसोबत त्याचा फिटनेस तसेच आहार या आणि अशा विविध विषयावर गप्प मारल्या आहेत. यावेळी ललित म्हणाला मी आतापर्यंत कधी डायट असं काही केले नाही मात्र आयुष्यात पहिल्यांदाचा मी आनंदी गोपाळसाठी एक महिन्याचा डायट केला. त्यावेळी मला समजलं की माझा किती माझ्यावर कंट्रोल आहे. तसेच त्याने सांगितले की मला घरच जेवण जसं की भाकरी, भात हेच आवडते आणि मला बाहेरच जसं की जास्त जंक फूड आवडत नाही. बॉडी बनवण्यासीठी मी कुठलच प्रोटीन शेक घेत नाही ललितला सोनालीने यावेळी त्याच्या पिळदार बॉडीविषयी विचारले तेव्हा ललित म्हणाला, मी आजपर्यंत कधी जीम केली नाही मात्र मी मला फीट ठेवण्यासाठी कधी फुटबॉल खेळतो तर कधी व्यायाम म्हणून मी लिफ्ट घेत नाही जिन्याचा वापर करतो. वेळ मिळेल तेव्हा हा शेवटचा दिवस आहे असं म्हणून मी व्यायाम करत असल्याचे सांगितले. तसेच बॉडी बनवण्यासीठी मी कुठलच प्रोटीन शेक घेत नसल्याचे देखील सांगितलं. तसेच यावेळी त्यांनी चाहत्यांना एक सल्ला देखील दिला आपलं शरीर कसं आहे त्यावरून आहार ठरवा तसेच जीम लावयची की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मला काहीही खालं तरी अंगाला लागत नसल्याचे सांगत त्याने मी सर्व खातो असे सांगितले तसेच म्हणाला मला शक्यतो जास्त भाज्या खाण्यास आवडत नाहीत. अशी होती ललिल आणि सोनालीची भेट यावेळी ललितने सोनाली खरेसोबतची पहिली भेट कशी होती ते देखील सांगितले. सोनालीच्या एका गाण्याच्या कार्यक्रमावेळी ललित त्याच्या मित्रासोबत प्रेक्षकांत बसण्यासाठी गेला होता. त्यावेळी मज्जा म्हणून आम्ही मोठमोठ्याने ओरडत होतो तसेच माझा एक मित्र तुझ्यावर लाईन मारत असल्याचा किस्सा देखील त्याने सोनालीला सांगितला. यासोबत त्या कार्यंक्रमात आमच्या रिअॅक्श पाहून तुमच्या दिग्दर्शकाने 80 रूपये दिल्याची आठवण देखील सांगितली. त्यावेळी ललितने सोनालीला पहिल्यांदा भेटल्याचा किस्सा सांगितला. वाचा :साडी काय ऋतुने गिफ्ट दिली का ?; सायली संजीवच्या फोटोवर चाहत्याची भन्नाट कमेंट सोनालीने या कार्यक्रमाचा भाग म्हणून काय टास्क दिले व प्रश्न देखील विचारले. यावेळी काही प्रश्नामुळे ललितच्या मनातील खरे बोल समोर आले. यावेळी सोनालीने बॉडी बनवण्याची सुरूवात मुलीपासून झाली का..तर ललित म्हणाला हो. कारण कॉलेजमध्ये पहिल्यांदा जाताना असतं ना, आपल्याला इतरांपेक्षा वेगळं दिसायचे आहे त्यातूनच ही सुरूवात झाली. तसेच त्याला ब्रॅ़ड प्रिट आवडत असल्याचे सांगत त्याला त्याच्यासख दिसायचं असल्याचे सांगितलं.
    सई ताम्हणकर ललितला वाटते चिंचेसाऱखी तर सोनाली कुलकर्णा वाटते आवळा.... यावेळी सोनालीने त्याला एक प्रश्न विचारला त्यामध्ये मराठी मनोरंजन विश्वातील कलाकारांन फळांचे व भाज्यांचे नाव घेत त्यांचे वर्णन करायचे होते. यावेळी त्याने सई ताम्हणकर मला चिंचेसाऱखी म्हणजे इमलीसारखी ..हा..मस्त अशी वाटत असल्याचे सांगितले, तर सोनाली कुलकर्णी मला आवळ्यासारखी वाटते तर वैद्यही परशराम नारळ पाण्यासाऱखी व अमेय वाघ संत्र्यासाराखा वाटत असल्याचे सांगितले. वाचा : Sachin Tendulker च्या लेकीचा फोटो पाहून 'या'अभिनेत्याला पडली भुरळ सईसोबत ललितला जायचं आहे फिटनेस डेटला... सोनालीने एक असा प्रश्न विचारला ज्यामुळे ललित खूप आनंदी झाला व म्हणाला असा काही तरी प्रश्न विचारयचा होतास. तो म्हणजे तुला फिटनेस डेटवर कोणासोबत जायला आवडेल ..यावल सोनाली म्हणाली की यावेळी ब्रॅ़ड प्रिट उत्तर देऊ नको. ललितने मात्र क्षणाचाही विलंब न लावता म्हणाला मला सईसोबत फिटनेस डेटवर जायला आवडेल. कारण विचारल्यानंतर ललित म्हणतो कारण, यापूर्वी आम्ही एकत्र व्यायाम केला आहे तसेच ती जे काय करते ते एकदम मन लावून करत असल्याचे ललित सांगितले. यानिमित्त ललितच्या मनातील खऱे बोल सर्वांना कळाले. सोनालीच्या या खरे बोलमध्ये ललितला पाहून चाहता वर्ग खूश होऊन कमेंटचा वर्षाव करत आहे. .
    Published by:News18 Trending Desk
    First published:

    पुढील बातम्या