Home /News /entertainment /

शुभमंगल सावधान! Suyash Tilak- Ayushi Bhave अडकले विवाहबंधनात! पाहा PHOTO

शुभमंगल सावधान! Suyash Tilak- Ayushi Bhave अडकले विवाहबंधनात! पाहा PHOTO

मराठमोळा अभिनेता सुयश टिळक (Suyash Tilak) आणि अभिनेत्री आयुषी भावे (Ayushi Bhave) आज, 21 ऑक्टोबर रोजी विवाहबंधनात (suyash tilak and ayushi bhave wedding ceremony) अडकले आहेत. त्यांच्या लग्नाचे काही सुंदर फोटो समोर (suyash tilak and ayushi bhave marriage photos )आले आहेत.

पुढे वाचा ...
  मुंबई, 21ऑक्टोबर : मराठमोळा अभिनेता सुयश टिळक (Suyash Tilak) आणि अभिनेत्री आयुषी भावे (Ayushi Bhave) आज, 21  ऑक्टोबर रोजी  विवाहबंधनात (suyash tilak and ayushi bhave wedding ceremony) अडकले आहेत. त्यांच्या लग्नाचे काही सुंदर फोटो समोर (suyash tilak and ayushi bhave marriage photos )आले आहेत. मराठीतील हे क्यूट कपल लग्नाच्या जोड्यात खुपच सुंदर दिसत आहे. चाहत्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. राजर्षी मराठीने इन्स्टावर सुयश आणि आयुषीच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. दोघेही सुंदर दिसत आहेत. कोरोनामुळे काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये हा लग्नसोहळा पार पडला. गेले दोन दिवस सुयशच्या घरी लग्नीघाई सुरू आहे. मेहंदी, हळद तसेच संगीत याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सर्व कार्यक्रम कोरोनाचे नियम पाळून व अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये पार पडले आहेत. काही कलाकार मंडळींनी देखील या कार्यक्रमाला हजेली लावली होती. सुयशने या सर्व कार्यक्रमाचे फोटो त्याच्या इन्स्टा स्टोरीला लावले होते.
  मराठमोळा अभिनेता सुयश टिळक 'तू तिथे मी' मालिकेतून घराघरात पोहोचला होता. या मालिकेमुळे त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. त्याच्या खऱ्या आयुष्यातील अदिती कोण असणार याची सर्वांचं उत्सुकता लागली होती. दरम्यान 'तुझ्यात जीव रंगला'फेम अक्षया देवधरसोबतही त्याच नाव जोडलं गेलं होतं. परंतु अभिनेत्याने आपल्या आणि आयुषीच्या साखरपुड्याचे फोटो शेअर करत सर्वांनाच आश्चर्यचकित केलं होतं. काही दिवसांपूर्वीच सुयशने अभिनेत्री आयुषीसोबत गुपचूप आपला साखरपुडा उरकला होता. नंतर स्वतः आयुषीच्या वाढदिवसाला हे फोटो शेअर करत त्याने सर्वांनाच सुखद धक्का दिला होता.
  या दोघांच्या साखरपुडा लूक सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला होता. 'माझ्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट सुंदर बनवणारी स्त्री. तुझ्याबरोबर माझं आयुष्य पूर्ण झालं आहे आणि मी खूप भाग्यवान कारण माझ्याकडे तुझ्यासारखी सुंदर जीवनसाथी मिळाली. सांगण्यास आनंद होतोय, आम्ही ऑफिशिअली एंगेज झालो आहोत. आपल्या सर्व प्रियजनांच्या आशीर्वादाने आणि प्रेमाने आम्ही एकत्र नवीन प्रवास सुरू करतोय.' अशी पोस्ट त्यावेळी सुयशने केली होती. वाचा : VIDEO: मुलगा आर्यनला भेटण्यासाठी शाहरुख खान पोहोचला आर्थर जेलमध्ये त्यांनतर सुयश आणि आयुषीच्या जोडीची प्रचंड चर्चा झाली होती. या दोघांच्या लग्नाकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर या दोघांच्या केळवणाचे फोटो व्हायरल झाले होते. मात्र दोघांनीही आपल्या लग्नाची तारीख जाहीर केली नव्हती.  आज अखेर ही जोडी लग्नाच्या बंधनात अडकली आहे. लग्नाचे काही सुंदर फोटो समोर आले आहेत. वाचा : Bigg Boss Marathi: बॉग बॉसने दिली कठोर शिक्षा! तीन सदस्यांना केलं थेट नॉमिनेट आयुषी भावे ही अभिनेत्री आणि लोकप्रिय डान्सर आहे. युवा डान्सिंग क्विन या टीव्ही शोमध्ये आयुषी भावे दिसली होती. आयुषी भावे लवकरच एका आगामी सिनेमात दिसणार आहे. सुयशच्या कामाविषयी सांगायचे तर तो शेवटचा शुभमंगल ऑनलाईन या मालिकेत दिसला होता.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi actress, Marathi entertainment

  पुढील बातम्या