Home /News /entertainment /

धक्कादायक! सेलेब्रिटी कपलला घरातील कुकनेच दिली जीवे मारण्याची धमकी;पोलिसांत पोहोचलं प्रकरण

धक्कादायक! सेलेब्रिटी कपलला घरातील कुकनेच दिली जीवे मारण्याची धमकी;पोलिसांत पोहोचलं प्रकरण

सध्या सर्वसामान्य लोकच नव्हे तर अनेक कलाकारांसोबत धक्कदायक घटना घडलेल्या समोर येत आहेत. छोट्या पडद्यावरील सर्वात आवडत्या कपल्सपैकी (TV Actors) एक असणारे माही विज आणि जय भानुशाली (Mahhi Vij & Jay Bhanushali) यांच्या घरातून एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 1 जुलै-   सध्या सर्वसामान्य लोकच नव्हे तर अनेक कलाकारांसोबत धक्कदायक घटना घडलेल्या समोर येत आहेत. छोट्या पडद्यावरील सर्वात आवडत्या कपल्सपैकी (TV Actors) एक असणारे माही विज आणि जय भानुशाली  (Mahhi Vij & Jay Bhanushali)  यांच्या घरातून एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. त्यांच्या घरात तात्पुरता काम करणाऱ्या कुकने माही, जय आणि त्यांची लाडकी मुलगी तारा भानुशाली यांनाजीवे मारण्याची धमकी दिल्याचं समोर आलं आहे.या धमकीनंतर दोघांनी पोलिसांत धाव घेतली होती. मात्र काही दिवस तुरुंगात काढल्यानंतर आता आरोपी जामिनावर तुरुंगाबाहेर आहे. अभिनेत्री माही विजने नुकतंच आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक ट्विट केलं होतं. यामध्ये तिने मुंबई पोलिसांनाही टॅगदेखील केलं होतं. क्षणार्धात सोशल मीडियावर हा ट्विट व्हायरल झाला होता. मात्र, काही वेळाने अभिनेत्रीने हे ट्विट डिलीटदेखील केलं होतं. या ट्विटमध्ये माहिने, आपल्या कुकने आपल्या कुटुंबाला उद्ध्वस्त करण्याची धमकी कशी दिली होती याचा उल्लेख केला होता.त्यामुळे सर्वच चकित झाले होते. त्यांनतर आता माहिने ई-टाइम्सला दिलेल्या मुलाखतीतही या घटनेबद्दल सविस्तरपणे सांगितलं आहे. नुकतंच ई-टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत माहीने सांगितलं की, या नव्या कुकला कामावर ठेवून अवघे तीनच दिवस झाले होते. त्यांनतर लगेचच तो चोरी करत असल्याचं आम्हाला समजलं. मी जयला सांगितलं आणि तो आल्यावर त्याने कुकचे बिल सेटल करण्याचा प्रयत्न केला. पण तो काही दिवसांचा नाही तर संपूर्ण महिन्याचा पगार मागू लागला. त्यावर जयने आक्षेप घेतला असता, 'मी 200 बिहारी आणून त्यांना इथे उभा करीन', अशी दादागिरी तो करू लागला. तो दारूच्या नशेत होता त्यांनतर तो शिवीगाळ करू लागला आणि जीवे मारण्याची धमकी देऊ लागला. या घटनेनंतर आम्ही पोलिसात जाऊन एफआयआर दाखल केला. या सर्व घटने दरम्यान माहिला आपल्या छोट्याशा लेकीची काळजी वाटत आहे. (हे वाचा:ITBP जवानाच्या गाण्याचा VIDEO सोशल मीडियावर होतोय VIRAL; आवाज ऐकून भलेभले थक्क ) माहीने या मुलाखतीदरम्यान बोलताना पुढे सांगितलं की, तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. मात्र आरोपीची जामिनावर सुटका झाल्याने अभिनेत्री नाराज आहे. अभिनेत्रीने असंही सांगितलं की पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतरसुद्धा तो व्यक्ती तिला फोन करत होता. सोबतच अभिनेत्रीला आता ही चिंता वाटतं आहे की, हा व्यक्ती तुरुंगातूनबाहेर आल्याने आपल्या कुटुंबाचा काहीतरी घातपात करण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे ती तिच्या जामिनावर नाराजी व्यक्त करत आहे.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Crime, Entertainment, Tv actors

    पुढील बातम्या