सुनील शेट्टी-रविना टंडन ते दिल्ली कॅपिटल्सची टीम झाली आहे Baba Ka Dhaba ची फॅन, केलं मदतीचं आवाहन

सुनील शेट्टी-रविना टंडन ते दिल्ली कॅपिटल्सची टीम झाली आहे Baba Ka Dhaba ची फॅन, केलं मदतीचं आवाहन

दिल्लीच्या मालवीय नगरमधील 'बाबा का ढाबा' चालवणाऱ्या आजीआजोबांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्वच स्तरातून मदतीचा हात पुढे येत आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 08 ऑक्टोबर : सोशल मीडिया हे सध्याच्या काळात प्रत्येक माणसापर्यंत पोहोचण्याचे साधन निर्माण झाले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून एखाद्यावर टीका केली जाते, तर एखाद्या व्यक्तीला क्षणार्धात प्रसिद्ध देखील केलं जाते. सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमुळे मात्र एका आजीआजोबांच्या चेहऱ्यावर गेलेलं हसू परतलं आहे.

सोशल मीडियावर एका 80 वर्षीय दाम्पत्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. कोरोनामुळे परिस्थिती बिकट झाल्यानंतर त्यांनी दिल्लीतील मालविया नगर जवळ बाबा का ढाबा नावाचा ढाबा सुरू केला. मात्र कोरोनामुळे ग्राहक येत नव्हते. या 80 वर्षीय बाबांचा रडतानाचा आणि लोकांना विनंती करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. एका दिवसात #BabaKaDhaba ट्रेंड होऊ लागलं, आणि आज सकाळपासून या ढाब्यावर लोकांनी तुफान गर्दी केली. या 80 वर्षांच्या दाम्पत्याला दिल्लीकर सढळ हस्ते मदत करत आहेत.

(हे वाचा- 'तुम ही मेरा प्रेम-निवेदन...',अभिनेत्रीच्या वाढदिवशी नवऱ्याची रोमँटिक पोस्ट)

एवढेच नव्हे तर आता बॉलिवूडकर आणि खेळाडू या साऱ्यांमध्ये 'बाबा का ढाबा'ची क्रेझ पाहायला मिळत आहे. या सेलिब्रिटींनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून बाबा का ढाबाला भेट देण्याचे आवाहन केले आहे. रणदीप हुडा, चित्रांगदा सिंग, रविना टंडन, सुनिल शेट्टी यांनी देखील 'बाबा का ढाबा' बाबत पोस्ट केली आहे. दादी चंद्रो तोमर यांनी देखील याबाबत पोस्ट केली आहे.

अभिनेत्री रविना टंडन हिने या ढाब्यावर तुम्ही काही खाल्ल तर त्याठिकाणचा फोटो पाठवण्यास सांगितले आहे, हा फोटो रविना स्वत: तिच्या सोशल मीडियावर शेअर करणार आहे.

'दिल्ली! चलो ‘बाबा का ढाबा’ पर मटर पनीर खाते हैं! मालवीय नगर में! ' अशी पोस्ट करत अभिनेत्री स्वरा भास्करने देखील याठिकाणी जाण्याचे आवाहन केले आहे.

अभिनेता रणदीप हुडाने तर याठिकाणचा पत्ताच शेअर केला आहे. आणि दिल्लीकरांना याठिकाणी भेट देण्याची विनंती केली आहे.

अभिनेता सुनील शेट्टीने असे म्हटले आहे की, 'चला त्यांच्या चेहऱ्यावरील हसू परत आणण्यात मदत करूया'

याचप्रमाणे निमरत कौर, चित्रांगदा सिंग, अथिया शेट्टी, सोनम कपूर यांनी देखील बाबा का ढाबाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. आयएफएस ऑफिसर प्रवीण कासवान यांनी याठिकाणी जमलेल्या गर्दीचा देखील एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

एवढेच नव्हे तर आयपीएलमध्ये खेळणारी दिल्ली कॅपिटल्सच्या टीमने देखील दिल्लीतील हा खास व्हिडीओ शेअर केला आहे. 'दिल्ली का दिल तो आज भी एक मिसाल है ना?' अशा शब्दात त्यांनी दिल्लीकराना भावनिक साद घातली आहे आणि या आजीआजोबांना मदत करण्याचे आवाहन केले आहे.

आर अश्विनने देखील या आजीआजोबांची मदत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. झोमॅटो ऑनलाइन या फूड डिलिव्हरी अॅपने सुद्धा यांना मदत करणार असल्याचे सांगितले आहे. यानंतर या आजीआजोबांच्या चेहऱ्यावर असणारं हसू लाखात एक आहे. त्यांच्या स्टॉलवर झालेली गर्दी खूप काही सांगून जाते आहे.

Published by: Janhavi Bhatkar
First published: October 8, 2020, 4:12 PM IST

ताज्या बातम्या