24जुलै: यंदाचा आयफा अवार्डसचा पुरस्कार सोहळा चांगलाच वादग्रस्त ठरलाय. आधी कंगनाची थट्टा केल्यामुळे या सोहळ्यावर टीका झाली होती आणि आता सेन्सॉर बोर्डाचे चीफ पहलाज निहलानी यांचा अपमान केल्याप्रकरणी सेन्सॉर बोर्डाने आयफाच्या निर्मात्यांना नोटीस पाठवली आहे.
सूत्रांनुसार आयफा अवार्डसच्या सोहळ्यात यावर्षी पहलाज निहलानी यांना 'चौकीदार' म्हटलं गेलं होतं. तसंच त्यांचे फोटो चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आले. मागच्या वर्षीही अशाच प्रकारे निहलानी यांची थट्टा उडवण्यात आली होती.
सी.बी.एफ.सीने पाठवलेल्या नोटीसमध्ये आयफाच्या निर्मात्यांना निहलानी यांची माफी मागायला सांगितली आहे. तसंच यापुढे आयफाच्या सोहळ्यात कुठल्याही सी.बी.एफ.सी चीफची बद्नामी करणार नाही अशी शपथही घ्यायला सांगितली आहे.
निहलानी यांना या नोटीसबद्दल विचारणा केली असता ते एवढंच म्हणाले ,'हे प्रकरण आता कायद्यानेच हाताळलं जाईल. आता कुणाला कधी हसवायचं आणि कुणाला कधी रडवायचं हे मला माहीत आहे'.
आयफाच्या निर्मात्यांनी मात्र नोटीसची काही गरज नसल्याचं म्हटलंय. तसंच निहलानी साहेबांचा काही तरी गैरसमज झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे. तसंच त्यांनी सोहळा टी.व्हीवर पाहिला तर त्यांचा गैरसमज दूर होईल असं निर्मात्यांचं म्हणणं आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा